
नवभारत अध्यापक विद्यालय तसेच जगजीवनराम माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी…
प्रा.दिनेश राठोड(ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
वर्धा :दिनांक14/4/2023
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष अनिल सोनवणे सचिव तथा माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मीनारायणजी सोनवणे सहसचिव नयन सोनवणे अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सुनील गावंडे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक प्रभाकर विके पर्यवेक्षक रमेश निमसाळकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मकेश्वर यांनी केले याप्रसंगी प्राध्यापक राजेश कापसे व संचित चमुने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विविध गीते सादर केली याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलजी सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच लक्ष्मीनारायणजी सोनवणे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना विविध गुण कौशल्य आत्मसात करून आचरणात आणावे असे सांगितले तसेच प्राचार्य सुनील गावंडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी प्राध्यापक श्रावण राठोड प्राध्यापक अभय मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदेशनीचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी प्रतीक्षा पवार व भूमिका सहारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाकर उईके यांनी केले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले कार्यक्रमाला प्राध्यापक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छात्राध्यापक व छात्राध्यापिका आदी उपस्थित होते

Total Users : 10829