
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने वाडा ते अंबाडी मोटार साईकल रँलीचे आयोजन व अंबाडी नाका येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन …
जोहार इंडिया 24 न्यूज प्रतिनिधी
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त पुर्ण जिल्हात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेच्या वतीने वाडा – देसई नाका ते अंबाडी नाका मोटार साईकल रँलीचे आयोजन करण्यात आले होते , रँली दरम्यान खंडेश्वरीनाका येथे तसेच अंबाडी नाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले , ….
अंबाडी नाका येथे आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले , अंबाडी परिसर , गणेशपुरी , वज्रेश्वरी , या भागातील ज्या नागरीकांवर अन्याय होतात अशा नागरीकांनी विश्वासाने या कार्यालयाशी संपर्क करावा आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेकडून सर्वसामान्य नागरीकांना अवश्य मदत केली जाईल असे संघटनेचे अध्यक्ष मा.अनंता वनगा यांनी यावेळेस माध्यमांशी बोलताना सांगितले. …. या मोटार साईकल रँलीमध्ये आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना अध्यक्ष – अनंता वनगा , सचिव – अरुण खुलात , संघटक – नितिन दळवी, संतोष जाधव , नाऊ माळी, आदेश पाटील , संतोष जांजर , तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Total Users : 10829