
कुत्र्यांनी वासरू केले ठार गाय जखमी
प्रा.दिनेश राठोड (ji24news)
जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
दि २२/०३/२०२३हिंगणघाट तालुक्यातील शेतकरी निखिल नरहरिराव उरकुडकर राहणार शिरूळ यांच्या शेतात गाय व वासरू गोठयात बांधून असतांना रात्रीच्या वेळेस तीन चार मोकाट कुत्र्यांनी गोठ्याचे दार फोडून आत शिरून वासराला ठार केले, व मोकाट कुत्र्यांनी वासराचे पोट फाडले काढले , सदर घटनास्थळी सकाळी शेतकरी निखिल उरकुडकर आपल्या गोठ्यात पाहताच वासरू रक्तबंबाळ होऊन मृत अवस्थेत आढळला त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले शासनाने याकडे गंभीरपणे लक्ष देऊन पीडित शेतकऱ्यांला त्वरित मदत देण्याची मागणी शेतकरी करीत आहे ,तसेचं मोकाट कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करावा ,अशी मागणी उरकुडकर परिवार करीत आहे ,आता पर्यत या मोकाट कुत्र्यांनी अनेक जनावरांवर हमला केला आहे ,या समोर अशी घटना घडू नये,अशी मागणी गावातील शेतकरी परिसरातील नागरिक करीत आहे ,
Total Users : 10829