
विक्रमगड मध्ये ग्रामीण भागात अखाती सण मोठ्या उत्साहाने साजरा….
प्रतिनिधी दीपक भोये विक्रमगड ji24news.
आज शनिवार दि.22/04/2023 रोजी विक्रमगड तालुक्यातील वाकी गावांमध्ये महिलांच्या पुढाकाराने अखाती सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते.नर- नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता.परशूरामाचे अवतरण सुध्दा याच दिवशी झाले होते असे मानले जाते या दिवशी परशूरामाची पूजा केली जाते जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करले तो पापांतून मुक्त होतो.यावेळी महिलांनी पारंपरिक गवराईची गाणी म्हटली गेली महिलांनी शोभा यात्रा करून मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
Total Users : 10829