
बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका प्रमुख तसेच ग्रामपंचायत झाप चे धडाडीचे सरपंच मा.एकनाथजी दरोडा साहेब यांच्या प्रयत्नाला यश…..
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाडji24news.
पालघर – पालघर जिल्ह्यामध्ये विविध तालुके आढळून येतात या जिल्हा मध्ये तालुक्यातील विविध गावे आहेत आणि या प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत आणि ग्रुप ग्रामपंचायत आहेत त्या मध्ये जे कर्मचारी असतात ते आपले कामे योग्य रीतीने करत आहेत काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ ग्रामस्थांना योग्य त्या पद्धतीने येथील कर्मचारी त्यांना मिळवून देत आहेत.
अश्याच प्रकारे जव्हार तालुक्यातील बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका प्रमुख तसेच ग्रामपंचायत झाप चे धडाडीचे सरपंच मा. श्री. एकनाथजी दरोडा साहेब यांनी आपल्या झाप या ग्रामपंचायतीला एकूण बावीस शबरी घरकुल योजना पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत झाप मध्ये सर्वात जास्त शबरी घरकुल योजना मंजूर करून दिली आहेत.
तसेच मा. श्री. एकनाथजी दरोडा साहेब हे नेहमी आपले कामामध्ये पुढाकार घेत असतात जसे की जलमिशन, रस्ते या मध्ये त्यांचा पुढाकार असतो.झाप ग्रामपंचायत मध्ये जिल्ह्याधिकारी साहेब सुद्धा दरोडा साहेबांच्या पाठपुराव्यामुळे आले असता मनमोहाडी,दखनेचापाडा,या गावांना कित्येक वर्षे होऊन गेले असता दरोडा साहेबांच्या अथक मेहनतीमुळे या गावांना रस्त्याची सुविधा करुन दिली.
Total Users : 10829