ji24news

समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात, महिला पोलीस निरीक्षकाचा मृत्यू….

समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात, महिला पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

प्रा.दिनेश राठोड (जिल्हा प्रतिनिधी – वर्धा)

समृद्धी महामार्गावर हरियाणा पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला असून यामध्ये महिला पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. शनिवार दिनांक 29 एप्रिल रोजी वर्धा येथील येळाकेळी टोलजवळ ही घटना घडली आहे.
सध्या समृद्धी महामार्ग हा जीवघेना मार्ग ठरलेला असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने या महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. शनिवारला वर्धा जिल्ह्यात एक अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. परभणी येथून आरोपीला हरियाणाला घेऊन जात असताना वर्ध्याच्या येळाकेळी येथील पांढरकवडा शिवारात हरियाणा पोलिसांचे वाहन समोर असलेल्या ट्रकला उजव्या बाजूने धडकले. यामध्ये वाहनातील महिला पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण ह्यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चारजण जखमी झाले आहेत. या गाडीत एकून पाच लोक चालले होते. वाहन चालक शमी कुमार, सविदर सिंग, वैदनाथ शिंदे, बिटू जागडा हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमी उपचारासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात : आरोपीला हरियाणा येथे घेऊन जाणाऱ्या हरियाणा पोलोसांचे वाहन वर्ध्या नजीक समृद्धी महामार्गावर ट्रकला धडकले. वर्धा येथील येळाकेळी टोल प्लाझा नजीक घडलेल्या या घटनेत हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरिक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहे. परभणी येथून आरोपीला घेऊन हरियाणा पोलीस समृद्धी महामार्गाने जात होते. दरम्यान वर्ध्याच्या येळाकेळी येथील पांढरकवडा शिवारात हरियाणा पोलिसांचे वाहन समोर असलेल्या ट्रकला उजव्या बाजूने धडकले. या पोलीस वाहनात 5 व्यक्ती होते. महिला पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण ह्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या गंभीर अपघातात वाहन चालक शमी कुमार, सविदर सिंग, वैदनाथ शिंदे, बिटू जागडा हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे
नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये या अपघात : वर्धा जिल्ह्यात घडलेल्या अपघाताने परिसरातील नागरिकांमध्ये हळूहळू व्यक्त होत आहे. एका महिला पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याने पोलिसांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. सातत्याने या रस्त्यावर होणाऱ्या अपघाताची काहीतरी उपाययोजना करावी अशीसुद्धा मागणी आता सातत्याने होत आहे. कारण, वारंवार होणारे अपघात हे जीवघेणे ठरत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये या अपघातात वाचणाऱ्यांना अपंग सुद्धा आलेले आहे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे एकंदरीत या समृद्धी महामार्गावरील अपघात कसे थांबवावे हा आता संशोधनाचा विषय बनलेला आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर