
6 व्या कल्याण ट्रॉफी स्केटिंग ओपन चॅम्पियनशीपमध्ये छत्रपती शिक्षण मंडळ – कल्याणच्या विद्यामंदिर मांडा – टिटवाळाचे सुवर्ण यश…
जोहार इंडिया 24 न्यूज टिटवाळा प्रतिनिधी –
शहाड दि.30 एप्रिल रोजी 6 वी कल्याण ट्रॉफी स्केटिंग ओपन चॅम्पियनशिप – 2023 दि.30/04/2023 रोजी शहाड येथील रिजन्सी अँटीलिया ता.कल्याण जि.ठाणे येथे पार पडली. ही स्पर्धा ओपन चॅम्पियनशीप असल्यामुळे पालघर,ठाणे,मुबंई,मुंबई उपनगर इ. जिल्ह्यांमधून जिल्ह्यांमधून शेकडो स्केटर्स सहभागी झाले होते.
या स्पर्धेत विद्यामंदिर मांडा – टिटवाळाच्या कु.दक्षतनया रामदास गाडर सातवी ( ब )हिने स्पीड इनलाईन मुलींच्या 12 वर्षे वयोगटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.तर कु.उत्कर्षा रामदास गाडर तिसरी ( अ )हिने देखील स्पीड क्वाड स्केटिंग मुलींच्या 12 वर्षे वयोगटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेकरिता कु.उत्कर्षास वर्गशिक्षिका – सौ.वसुधा पाटील मॅडम व मुख्याध्यापक सौ.स्वप्ना दिक्षित ( प्राथ.) यांचे मार्गदर्शन लाभले तर कु.दक्षतनयास वर्गशिक्षक श्री.खडके सर व मुख्याध्यापक श्री.वाव्हल सर ( माध्य.) यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्केटर्सच्या सुवर्ण यशाबद्दल शाळेकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या गाडर भगिनी सध्या टिटवाळा येथे सागर स्केटिंग अकॅडेमीच्या कुलदीप सागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगचे धडे गिरवत आहेत.
Total Users : 10829