
त्रंबकेश्वर तालुक्यामध्ये वनव्यात वनसंपदेचे नुकसान.
प्रतिनिधी- जयवंत हगोटे त्रंबकेश्वरji24news
त्र्यंबकेश्वर तालुका हा पर्यावरण आणि निसर्ग संपदेचा दृष्टिकोनातून आजही अग्रेसर तालुका म्हणून ओळखला जातो तालुक्यात गेल्या तीन महिन्यात अनेक ठिकाणी वनवे लावण्यात आले त्यात वेळुंजे,धुमोडी, गणपतबारी या शिवाराततील जंगले वनव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा खाक झाली या वनविभागातील लागलेल्या आगीत झाडे, झुडपे, झाडांवरील पक्ष्यांची घरटी, अंडी जळून खाक झाले आहेत या जैविक नुकसानीचे परीक्षण होणे गरजेचे आहे अशी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष उत्तम लिलके तालुका संघटक जयवंत हागोटे तसेच गावातील नागरिकांची मागणी आहे.

Total Users : 10828