
वाडा भिवंडी महामार्गावर अपघात...
प्रतिनिधी- दीपक भोये विक्रमगड.ji24news.
वाडा भिवंडी या महामार्गावर बसचा कंटेनरला मागून धडकून अपघात झाला आहे. या अपघातात वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या जखमी प्रवाशांवर कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल करण्यातआले आहे. सदर बस ही एम. एच . 14 बी. टी. 2090 क्रमांकाची पालघर – कल्याण – वडूज बस असून यामध्ये 65 प्रवासी प्रवास करत होते. खरं म्हणजे पुढच्या कोकाकोला कंपनीजवळ वाडा भिवंडी महामार्गाच्या दोन्ही लेनला अनाधिकृत वाहने ही पार्क केलेली असतात. व यामुळे अनेक वेळा यापूर्वी अपघात झाले असून त्यात अनेकांना मार लागून जखमी होऊन अपंगत्व येऊन काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र वारंवार अपघात होऊन देखील तेथील मुजर्ग कंपनी प्रशासन व कोका कोला कंपनीत जाणाऱ्या व येणाऱ्या अवजड वाहनांना पार्किंगची कुठलीही सोय करत नाहीत. यामुळे ही वाहने रस्त्यावरच पार्किंग करावी लागत असल्याने तेथे अपघाती होत असतात तसेच आजही त्याचप्रमाणे झाले असल्याचे दिसते. कंपनीतून माल भरून निघालेला कंटेनर हा उभा करण्यासाठी अचानक रस्त्यावर आल्याने महामार्गावरून जाणाऱ्या दुसऱ्या टेलरने ब्रेक मारला व त्यामागून येणाऱ्या बसला ब्रेकचा कंट्रोल न झाल्याने बस कंटेनरच्या मागून येऊन जोरात धडकली. यामुळे हा संपूर्ण अपघाताचा घटनाक्रम झाला. स्थानिक लोकांच्या मदतीने या बस मधील अपघातग्रस्तांना कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात महिलांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते त्यात अनेकांना डोक्याला , नाकाला व हातापायांना जबर मार लागल्याचे दिसते. तर एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याने वाडा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे या अपघाताची दखल घेऊन शिवसेना ( ठाकरे गट ) माथाडी कामगार सेना पालघर जिल्हा पदाधिकारी व वाहतूक सेना उपाध्यक्ष पालघर जिल्हा श्री परशुराम भोईर यांनी अपघात ग्रस्त ठिकाणी जाऊन कोकाकोला कंपनीने त्यांच्या गाड्यांची पार्किंग सुविधा न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा कोकाकोला कंपनी प्रशासनाला दिला आहे .
Total Users : 10829