
झाडांना जीवनदान अभिनव उपक्रम!
प्रा.दिनेश राठोड ji24news (जिल्हा प्रतिनिधी – वर्धा )
वर्धा – शहरात विकास होतो आहे. परंतु, त्यासोबत काही गोष्टींना उतरती कळाही लागली आहे. रस्त्याचे जसे वाटोळे झाले तसेच हिरव्या झाडांनाही या विकास कामांत नख लावल्या गेले.
वाहतुकीला अरथळा होत असल्याच्या कारणाहून अनेक झाडं तोडून टाकण्यात आले. मात्र, काही वाचवण्यात वर्धेतील पर्यावरण प्रेमींना यशही आले. आता त्या मार्गावर सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाल्याने झाडांच्या बुुंध्याशी गट्टू लावण्यात येत आहेत. त्यामुळे ती झाडं पुन्हा वाळत असल्याचे येथील वैद्यकीय जन जागृतीचे मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांच्या लक्षात आले. त्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना या प्रकाराची माहिती दिली. DM Kardile जिल्हाधिकार्यांनीही विलंब न करता त्यावर अॅक्शन घेतली आणि झाडांच्या बुंध्याला लावण्यात आलेले गट्टू काढण्याचे काम सुरू झालेल्याने जिल्हाधिकार्यांच्या तत्परतेने मरणवाटेवर असलेल्या झाडांना जीवनदान मिळाले.
आपण झाडांची कत्तल झालेली ऐकतो, बघतो, चर्चा करतो पण उपाययोजना करण्यात दिरंगाई होत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. वर्धा नागपूर मार्गावर दुतर्फा नजर फिरविली तर कडेला असलेली 50 ते 70 वर्ष जुनी झाडे दिसतात. मुख्यतः कडुलिंबाची झाडे आहेत. नागपूरला जात असताना डॉ. सचिन पावडे यांना त्या विशाल झाडाच्या बुंध्याशी घट्ट गट्टू लावण्यात आल्याने सदर झाडे हळूहळू जीव सोडत वाळत चालली असल्याचे लक्षात आले. डॉ. सचिन पावडे यांनी लगेच ही गोष्ट जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या ती बाब निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकार्यांनी DM Kardile लगेच प्रतिसाद देत अभियंत्यांची एक टीम गठीत केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंता आचार्य यांच्या चमुने त्यावर काय उपाययोजना करता येईल याची पाहाणी केली. लगेच उपाय करण्यात आल्या आणि सरणाला जाणार्या झाडांना जीवनदान दिले. वक्तृत्व तर सर्वच करतात पण कर्तृत्व महत्त्वाचे असते. वर्धेतील पर्यावरण संवेदनशील डॉ. सचिन पावडे तसेच वैद्यकीय जन जागृती मंचचे निसर्गप्रेमी सदस्य आणि जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डीले यांच्या कार्यतत्पतेमुळे वर्धा जिल्हा पर्यावरण संरक्षण करणे शक्य आहे.
Total Users : 10829