ji24news

आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखिल मिळणार निवृत्तीनंतर मानधन तत्वावर नोकरी !

आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखिल मिळणार निवृत्तीनंतर मानधन तत्वावर नोकरी !

प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी वर्धा

राज्य सरकारने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नविन योजना काढली आहे , ती योजना म्हणजे शिक्षण सारथी योजना होय . या योजनेच्या माध्यमातुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे ,
महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच शाळांची पटसंख्या ही 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी झालेली आहे, अशा शाळांमध्ये नियमित 2 ते 3 शिक्षक ठेवणे राज्य सरकारला परवडणारे वाटत नाहीत . याकरीता राज्य सरकारने नविन शिक्षण सारथी योजना लागु करण्याचा विचार केला आहे .यानुसार ज्या शाळांची पटसंख्या ही 20 पेक्षा कमी झाली आहे अशा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात येणार नाहीत .
परंतु त्या शाळेवर नियमित शिक्षकांची नियुक्ती न करता मागील 01 ते 02 वर्षांखाली सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची नियुक्त करण्यात येणार आहे , अशा शिक्षकांना नियमित पगार न देता प्रतीमाह 20 हजार रुपये मानधन देण्याची मोठी भूमिका राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे .असा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांनी तयार करुन राज्य शासनांला सादर केल्याची माहिती सुत्रानुसार समोर येत आहे .
सध्या राज्यांमध्ये पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे जास्त वळत असल्याने राज्यातील जिल्हा परिषदा शाळा हळूहळू बंद होत आहे , परिणामी जिल्हा परिषदेचे 1 ते 4 वर्षांसाठी नियमित 1 अथवा दोन शिक्षकांची नियुक्ती करणे राज्य सरकारला परवडणारे नाहीत .यामुळे शिक्षण सारथी हा नवा उपक्रम राज्य शासनांकडून राबविण्यात येणार आहे
शिक्षण सारथी भुमिका व मानधन
शिक्षण सारथी म्हणजे सेवानिवृत्तीनंतर पुढील 2 वर्षांकरीता आपल्या गावातीलच / जवळच्या शाळेमध्ये ( कमी पटसंख्या असणाऱ्या शाळैवर ) आणखी नोकरी करता येणार आहे . याकरीता 20,000/- रुपये ऐवढे मासिक मानधन अदा करण्यात येणार आहे .

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर