
चिकमोह येथे सोसाट्याचा वाऱ्यामुळे घरांची टिनपत्रे उडाली मोठ्याप्रमाणात नुकसान.... प्रा.दिनेश राठोड (ji24news)जिल्हा प्रतिनिधी - वर्धा. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील चिकमोह या गावातील ग्रामस्थांचे जवळपास पाच लाख रुपयांचे वर नुकसान झाले आहे व एक महिला जखमी काल रात्री १२ च्या सुमारास चिकमोह येथे विजाच्या गडगडाटासह मोठया प्रमाणात गारपीटही झाली,चीकमोह गावाची लोकांचे घरावरील छप्पर उडून गेले विजेचे खांब, झाडे मोडले आहे ,घरे घराचे विटांच्या भिंती कोसळल्या , शेळ्या मरण पावल्या ,ग्रामस्थ मारुती सोरटे, जयराम कुलासंगे, वांढरे सह अनेक लोकांचे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, रात्री १२ च्या सुमारास विजेचे खांब, झाडे मोडली आहे त्यात ग्रामस्थांचे अनुक्रमे मारुती सोरटे, सत्तर हजार रुपये,जयराम कुळसंगे, वांढरे,चंद्रशेखर रोडे यांचे साठ हजार रुपये, नंदा भोयर यांचे 70 हजार रुपये उद्धव मेश्राम पन्नस हजार रुपये जखमी गोठा पायावर पडुन सुमित्र मेश्राम जखमी वीस हजार रुपये, मारुती चोरटे, महादेवराव मेश्राम पन्नास हजार रुपये ,राजेंद्र तुळसे यांचे वीस हजार रुपये अनिल तुडसे वीस हजार रुपये गजानन उबाड यांचे वीस हजार रुपये राजेंद्र रोटे यांचे वीस हजार रुपये,जयाराम कुरसंगे वीस हजार रुपये, व रमेश ठाकरे यांचे पंधरा हजार रुपये, रमेश वावरे,दिनकर येटे किशोर बायदे यांचे ही या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे,या घटनेचा शासनाने तात्काळ पंचनामा करून सर्वांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे,
Total Users : 10829