
जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी वर्धा
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा द्वारा आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबिराला दिनांक 10 मे 2023 ला प्रारंभ झाला, या कार्यक्रमातचे उद्घाटक म्हणून माननीय शिक्षणाधिकारी सचिनजी जगताप हे लाभले, तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय लतिका लेकुरवाळे ,जिल्हा क्रीडा अधिकारी या उपस्थित होत्या, या शिबराचे मुख्य संयोजक, क्रीडा अधिकारी श्री संदीप खोब्रागडे उपस्थित होते या प्रशिक्षणात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे येथे प्रशिक्षण घेऊन आलेले मास्टर ट्रेनर सुजाता जोशी, प्रीती सत्यकार वैभव साखरकर, सुशांत गहेरवार फैजान शेख, मुस्तफा बक्ष,शुभम जुगनाके मंगेश भोंगाडे,किसन म्हात्रे यांच्या द्वारा क्रीडा शिबिराचे नियोजन करण्यात आले,या शिबिरास जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एकूण 121 क्रीडा शिक्षकांनी उपस्थिती दर्शविली. जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असलेल्या प्रशिक्षणामध्ये सुसज्ज सुव्यवस्थित विविध खेळांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच सहभागी क्रीडा शिक्षकांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली,या शिबिरात आजपर्यंत श्री नितीन घोडे (व्हॉलीबॉल कोच) नितीन जाधव (जिम्नॅस्टिक कोच) मनोज झाडे (बॅडमिंटन कोच) प्रितेश रामटेके (हँडबॉल कोच)
सौ. संजीवनी माने (योग प्रशिक्षक) शुभम घोरपडे (नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन) डॉ.सुमित मेश्राम (फिजिओथेरपिस्ट) डॉ. नारायण मूर्ती (फिजिकल सायकॉलॉजिस्ट) गौरव चेनांनी (रग्बी) श्री राजू मडावी खो-खो व झेंडा व्यवस्थापन) आनंद भाकरे (लंगडी ) श्री सुधाकर वाघमारे (परीक्षा मूल्यमापन) डॉ. भुसारी (न्यूट्रिशीयन) सुशांत गहेरवार (ज्यूडो) व सहकारी यांनी उपरोक्त खेळाविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले,सदर प्रशिक्षण शिबिर हे दिनांक 17 मे 2023 पर्यंत चालणार असून अनेक विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे सदर शिबिराची संपूर्ण व्यवस्था व नियोजन क्रीडा विभागाचे व्यवस्थापक श्री रवी काकडे जिल्हा क्रीडा संकुल वर्धा व त्यांचे सहकारी हे करीत आहेत.

Total Users : 10829