ji24news

वर्धा जिल्ह्यात बारावीच्या निकालात मुलीच अव्वल, जिल्ह्याचा निकाल ८४.५१ टक्के,

वर्धा जिल्ह्यात बारावीच्या निकालात मुलीच अव्वल, जिल्ह्याचा निकाल ८४.५१ टक्के

प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा

इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. वर्धा जिल्ह्यातही उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींचं प्रमाण अधिक आहे. मुलींची टक्केवारी मुलांच्या तुलनेत अधिक आहे.
वर्धा जिल्ह्याचा निकाल ८४.५१ टक्के लागला आहे. यामध्ये मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ८९.०४ आहे. जिल्ह्यात ८०.११ टक्के मुले बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.
१६०६२ विद्यार्थ्यांनी दिली परिक्षा:
गुरुवारी २५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांसह शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे निकाल सर्च केलेत. जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेकरिता ८१९२ मुले, ७९३१ मुली असे मिळून १६१२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८१४३ मुले तर ७८८९ मुली असे १६०३२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यात ६५२४ मुले आणि ७०२५ मुली असे १३ हजार ५४९ परीक्षार्थी उत्तीर्ण झालेत.
हिंगणघाट येथील महेश ज्ञानपीठ कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची लक्ष्मी सुरेश गजराणी हिला सर्वाधिक ९६.३३ टक्के गुण मिळाले. हिंगणघाटच्या होली फेथ वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी तृप्ती मातुरे हिला ९५.६७ टक्के गुण मिळाले आहेत. वर्ध्यातील न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाचा सोहम मनोज कोल्हटकर, हिंगणघाटच्या जीबीएमएम कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी केतकी अभय शिंगोटे, न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाची जान्हवी राजेश पुनसे या तिघांना ९४.५० टक्के गुण मिळाले आहेत.
आष्टी तालुक्याच्या निकालाची टक्केवारी सर्वाधिक ९४.८८ टक्के आहे. वर्धा तालुका ८९.९६, आर्वी ७२.४३, देवळी ८७.३४, हिंगणघाट ८२.३३, कारंजा ७२.७९, समुद्रपूर ८२.८० आणि सेलू तालुक्याचा निकाल ७६.९५ टक्के लागलेला आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर