ji24news

नव्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात ‘एक राज्य एक गणवेश योजना’, दीपक केसरकर यांची घोषणा.

नव्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात ‘एक राज्य एक गणवेश योजना’, दीपक केसरकर यांची घोषणा

प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा

महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश योजना अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. यावर्षीपासून राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतले विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. सर्व सरकारी शाळांसाठी आता एकच गणवेश लागू होईल असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी हेदेखील स्पष्ट केलं आहे की सरकारच्या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर काही शाळांनी दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी तीन दिवस सरकारी योजनेचा आणि तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.
काय म्हटलं आहे दीपक केसरकर यांनी?
एक राज्य एक गणेवश ही संकल्पना या वर्षापासून आम्ही अस्तित्त्वात आणतो आहोत. परंतू काही शाळांनी काही ऑर्डर दिल्या आहेत. त्यामुळे तीन दिवस शाळेने ठरवून दिलेला गणवेश आणि तीन दिवस सरकारने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थी वापरतील. शाळेने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थी सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस परिधान करतील. तर सरकारने ठरवून दिलेला गणवेश हा गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस परिधान करतील असा पर्याय आम्ही आता काढला आहे असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.
कोणत्या रंगाचा आहे सरकारी गणवेश?
आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट असा हा गणवेश असेल. मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचा स्कर्ट असेल. जर शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची आणि कमीज आकाशी रंगाची असं असेल असंही दीपक केसरकर यांनी सांगितलं. मुलांना सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली पाहिजे या भावनेतून आम्ही हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचा गणवेश हा स्काऊट गाईडशी साधर्म्य साधणारा असेल असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. या विद्यार्थ्यांना सरकार बूट आणि मोजेही देणार आहे. त्यामुळे विद्यार्थी टापटीप आणि छान दिसतील. अनेकदा ग्रामीण भागात अनवाणी मुलं जातात. तसं आता होणार नाही. आधी मागासवर्गीय मुलांना गणवेश देत होतो आता सगळ्या मुलांना गणवेश दिला जाणार आहे.
आमचा निर्णय शासकीय शाळांसाठीच आहे,
आमचा हा निर्णय शासकीय शाळांसाठीच आहे. मात्र खासगी शाळांनी विचार केला पाहिजे. कारण आम्ही खासगी शाळा काढल्या, १०० टक्के पगार शासनाकडून घेतो, इतर खर्च शासनाकडून घेतो. परंतु त्या शाळा शासकीय नाहीत त्यामुळे याचा विचार केलाच पाहिजे. मी एकदा शैक्षणिक संस्थांसोबत बसणार आहे. त्या मुलांनाही गणवेश दिला जाईल असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. खासगी शाळा चालक यासाठी पुढे येणार का? हा प्रश्न आहे. आमच्यासाठी मुलांचं हित हे सर्वोच्च आहे असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर