
यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिडी येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा…
प्रा.दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
लोकनेते माजी आमदार प्रा.सुरेशभाऊ देशमुख यांच्या अमृत महोत्सव कृतज्ञता वर्ष 2023 -24 निमित्ताने स्थानिक यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिडी येथे दिनांक 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य सन्मा. के एन. सय्यद साहेब उपस्थित होते. उद्घाटक म्हणून सन्माननीय प्रकाशराव ढांगे साहेब,जनरल सेक्रेटरी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा, तर प्रमुख अतिथी म्हणून माननीय सचिन बिरे सरपंच ग्रामपंचायत भिडी, श्री सुनील चोरे श्री सुरेशराव आलोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम श्रद्धेय दादाजी उर्फ बापूरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर विद्यालयांच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी पर्यावरण* व वृक्षारोपणाची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. तसेच अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सय्यद साहेब यांनी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन* प्रा.अरविंद राठोड यांनी केले तर उपस्थिताचे आभार कापकर मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी इत्यादींची उपस्थिती होती.

Total Users : 10829