
मोखाडा तालुक्यात दीपक फाउंडेशन मार्फत “आयुष्यमान भारत शिबीर संपन्न”…
पालघरप्रतिनिधी: सौरभ कामडीji24news
ग्रामीण भाग असलेला मोखाडा तालुक्यामधील धामणशेत-कोशीमशेत या ग्रुप ग्रामपंचायत येथील कोशिमशेत गावामध्ये सोमवार दिनांक १५/५/२०२३ रोजी दीपक फाऊंडेशन मार्फत आयुष्यमान भारत कार्ड शिबिर आयोजित केले होते. आयुष्यमान भारत योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. या योजनेमध्ये पात्र असलेल्या व्यक्तीला पिवळे कार्ड बनवून मिळते. त्यावरून कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळवू शकतो. या योजनेचे महत्व व फायदे लोकांना दीपक फाऊंडेशनचे प्रोजेक्ट कोर्डीनेटर आश्विनी दाते, सुपर सुपरवायझर गोपिनाथ धोडी, फॅसिलेटर जगन धिंडे व ललेश वळवी यांनी समजावून सांगितले यामुळे या शिबिरासाठी लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. या योजनेचे फायदा गावपातळीवर जास्तीत जास्त गरीब व गरजू कुटुंबांना मिळावा यासाठी या शिबिराचे आयोजन केले होते.
दीपक फाऊंडेशन हि संस्था २०१८ पासून मोखाडा तालुक्यात काम करत असून यापूर्वी या संस्थे मार्फत मोखाडा तालुक्यातील साखरी-गोंदे खुर्द, वाशाळा, शिवली, खोच-धोंडमाऱ्याचीमेट, पोशेरा, निळमाती-दांडवळ, हिरवे-घानवळ,मोऱ्हांडा-गोंदे बुद्रुक या ग्रामपंचायतमध्ये आयुष्यमान भारत कार्ड, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड, आधार कार्ड, पँनकार्ड,नवीन बँक खाते खोलणे, मतदान ला आधार कार्ड लिंक करणे आणि PM किसान योजना इत्यादी अनेक शिबिराचे आतापर्यंत आयोजन करण्यात आले होते. या शिबिराद्वारे ११२३१ आतापर्यंत एवढ्या लोकांनी लाभ घेतला आहे.
Total Users : 10829