
यारी दोस्ती ग्रुपच्या माध्यमातुन घर जळालेल्या आजोबांना तात्काळ किराणा किटची मदत…..
प्रतिनिधी -दीपक भोये
विक्रमगड
दिनांक १९ जून २०२३ रोजी, पालघर तालुक्यातील बऱ्हाणपूर गावातील श्री. आप्पा देवजी वरठा (वय ६५ वर्षे) यांचे एका दीर्घ आजाराने हातापायाची बोटे गमावली आहेत, यामुळे त्यांना कुठेही काम करता येत नाही. यातच त्यांचे दिनांक १९ जून रोजी रात्री ०४ वाजता झोपडीला आग लागून लहानशी झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली. या झोपडीत चुली मध्ये आग असेल आणि रात्री वाऱ्यामुळे झोपडीवर प्लास्टिक असल्याने त्याला आग लागली आणि बघता बघता पूर्ण झोपडी जळून खाक झाली. यामध्ये सर्व कागदपत्रे आधार कार्ड, दाखले, रेशनकार्ड, तांदुळ, भात, भांडे, कपडे, चादरी सर्व संसाराचे साहित्य जळाले. या झोपडीत आजी आजोबा दोघेच राहत होते. सुदैवाने दोघेही सुखरूप आहेत. पण घरातील सर्व जिवणाश्यक साहित्य जळाल्याने त्यांना पुढील संसार करायला खूप अडचणी येतील.
हे स्थिती स्थानिक यारी दोस्ती ग्रुप सदस्याला समजताच ग्रुप कडून तत्काळ मदत करण्याचे ठरविले. आज लगेच संध्याकाळी जावून त्यांच्या कडे जावून त्यांना किराणा किट, छत्री, ताडपत्री आदी जिवणाश्यक साहित्याची मदत केली. तात्काळ मदत केल्यामुळे त्या आजी आजोबाना आधार मिळाला. यामुळे त्यांनी यारी दोस्ती ग्रुप चे खूप खूप आभार मानले.
Total Users : 10829