
वुशू स्पोर्ट्स स्पर्धेत हिंगणघाटच्या खेळाडूंना अभूतपूर्व यश
प्रा. दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी वर्धा
जिल्हा क्रीडा कार्यालय व वुशू स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्याने अध्यक्ष व आयोजक श्री निलेश राऊत सर यांच्याद्वारे 22 जून 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येथे 4 थी जिलास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली
या स्पर्धेत हिंगणघाट तालुका वुशू स्पोर्ट असोसिएशन व ” दी फायटर प्लॅनेट क्लब”हिंगणघाट च्या एकूण 23 खेळाडूंनी सहभाग घेतला व उत्कृष्ट प्रदर्शन करीत 23 पदक पटकाविले.
स्पर्धेचे उद्घाटन सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष IAS मा. श्री राजेशजी शेपट साहेब व प्रमुख पाहुणे म्हणून मा.जिल्हा क्रीडाअधिकारी श्रीमती लतिका लेकुरवाळे,
तसेच मा.श्री मदन इंगळे, मा. श्री समीर शेंन्डे, मा. श्री संजय इंगळे व मा. श्री प्रवीण इंगोले यांच्याद्वारे करण्यात आले.
या स्पर्धेत मुलांच्या ईच्छेवरून दी फाइटर प्लॅनेट क्लब चे संचालक श्री सुशांतसिंह गहेरवार यांनी 4 वर्षा नंतर खेळात वापसी केली आनी 75 किलो वजन घटात सुवर्ण पदक पटकविला यास बरोबर सीनियर वयोगटात फैजान शेख अणी कबीर महेशगौरी यांनी सुवर्ण पदक जिंकले.
जूनियर वयोघटात मुलिंमधे नैत्रा आंबटकर व मुलांमधे रंजीत राउत , हर्ष बालपांडे याणी सुवर्ण पदक तसेस निरमेश शेंडे आनी आर्यन गुजरकर यानी रौप्य पदक पटकविले.
सब-जुनिअर वयो गटात जवेरिया शेख, तनिष्का वानखेडे, सायली जामकुटे, आरुषी लेडे, सानवी झलके, वैष्णवी डाखुरे, युक्ता कटारिया यांनी सुवर्ण पदक व खुशी नगराळे यांनी रौप्य पदक जिंकले तसेच मुलांमधे राजवीर गहेरवार, थम्यक सुरकार, प्रशिल कांबळे, श्रीजीत देशमुख, श्लोक नव्हाते या मुलांनी सुवर्ण पदक जिंकले तसेच समीर शेख नि रौप्य व धैर्यवीर गहेरवार नी कास्य पदक जिंकले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष IAS मा. श्री राजेशजी शेपट साहेब व इतर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले व या सर्वांचे सहकार्याने स्पर्धा आनंदी वातावरणात पार पाडण्यात आली.खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय आपले आई वडील व कोच श्री सुशांत सिंह गहेरवार, श्री परवेज खान,श्री आशिष वांढरे, श्रीमती नम्रता दुबे यांना दिले.
त्याचप्रमाणे वर्धा जिल्हा येथे चांगले खेळाडू वुशू या खेळात निर्माण होऊ शकतात याची शाश्वती दिली. खेळाडूंच्या कौशल्यावरून त्यांच्या प्रशिक्षकांची सुद्धा प्रचिती झाली एक प्रशिक्षक आपल्या खेळाडू मागे नक्कीच भर देत आहे याचे जिवंत उदाहरण आपणास पाहण्यास मिळाले. क्रीडा क्षेत्रासाठी नेहमीच चांगले सहकारी सहकार्य करण्यास तत्पर असतात हे सुद्धा यावेळी निदर्शनास आले .

Total Users : 10829