
वर्ध्यातील 12 प्रवाशांची ओळख पटली, सर्वत्र शोककळा….
प्रा.दिनेश राठोड ji24newsजिल्हा प्रतिनिधी – वर्धा
समृद्धी म्हार्गावरील सिदखेड राजा हद्दीतील दुर्घटनेत वर्ध्यातील 14 प्रवाशांना जीव गमवावा लागला. त्यामुळे संपूर्ण वर्ध्यात शोककळा पसरली आहे. दुपारपर्यंत 12 प्रवाशांची ओळख पटली. त्यात अवंती पौनीकर, संजीवनी गोटे, प्रथमेश खोडे, श्रेया वंजारी, राधिका खडसे, तेजस पोकळे, तनिष्क तायडे, शोभा वनकर, वृषाली वनकर, ओवी वनकर, करण बुधबावरे, राजश्री गंडाळे यांचा समावेश आहे.यापैकी काही विद्यार्थी आहेत. इतर दोन नावांचीही पडताळणी सुरू आहे. प्रवासाच्या प्रवासी यादीत एकाचे नाव प्रथम आले आहे. अपघातात जखमी झालेला प्रवासी वर्ध्याहून बसमध्ये चढला होता. तो मुळात हिमाचलचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. पंकज रमेशचंद्र असे त्याचे नाव सांगण्यात आले आहे.
हे आठ लोक वाचले
लक्झरी बसचे चालक शेख दानिश शेख इस्माईल (50, दारव्हा जि. यवतमाळ), क्लिनर संदीप राठोड (31, तिवसा, जि. अमरावती), योगेश गवई (संभाजीनगर), साईनाथ पवार (19, माहूर), शशिकांत गजभिये (यवतमाळ) यांचा समावेश आहे. आणि पंकज रमेशचंद्र (हिमाचल प्रदेश) यांचा समावेश आहे. चालक व क्लिनरला सिंदखेड राजा पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांनाही पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे
Total Users : 10829