
आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना वाडा तालुका कमिटीच्या वतीने गुहिर शासकिय आश्रमशाळेतील समस्यां संदर्भात प्रकल्प कार्यालय जव्हार यांना निवेदन दिले….
प्रतिनिधी – दिपक भोये विक्रमगड
आज दि. ३०/०६/२०२३ रोजी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना वाडा तालुका कमिटीच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अधिकारी आयुशी सिंग मॅडम यांना भेटुन गुहिर शासकिय आश्रमशाळेतील समस्या संदर्भात चर्चा करुन समस्या निदर्शनास आणुन दिल्या. .गुहिर शासकिय आश्रमशाळेत जिल्ह्यातील विद्यार्थी हे निवासी राहतात,सदर आश्रमशाळेत ८०० ते ९०० विद्यार्थी असुन पटसंख्येनुसार शिक्षक भरती करावी,असे सुद्धा निदर्शनास आणुन दिले.निवासी आश्रमशाळा असताना शिक्षक मात्र निवासी राहायला तयार नाहीत या संदर्भात प्रकल्प अधिकारी यांच्याशी चर्चा करुन निवासी शिक्षकांची नेमणुक करावी अशी मागणी केली आहे.तसेच या आश्रमशाळेत महिला अधिक्षका नसल्याने विद्यार्थीनींची गैरसोय होत असुन मुलींच्या अडीअडचणी मध्ये महिला अधिक्षका ही आईची भुमिका बजावत असते,त्यामुळे वरील दोन्ही विषयांचे गाभिर्य लक्षांत घेवुन निवासी शिक्षक भरती व निवासी महिला अधिक्षका यांची नेमणूक करावी अशी मागणी सुद्धा आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना वाडा तालुका कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा ,जिल्हा अध्यक्ष अरुण खुलात,जिल्हा संघटक नितिन दळवी , वाडा तालुका कमिटी अध्यक्ष मा. दयानंद हरळ,वकिल किरण भोईर उपस्थित होते
Total Users : 10829