ji24news

शेतकऱ्यांनी किटकनाशके वापरतांना काळजी घेण्याचे आवाहन…

शेतकऱ्यांनी किटकनाशके वापरतांना काळजी घेण्याचे आवाहन

प्रा.दिनेश राठोड ii24news जिल्हा प्रतिनिधी – वर्धा

वर्धा : कोणतेही किटकनाशक हे मनुष्य प्राण्यांच्या तसेच इतर जिविताकरीता अपायकारक प्रसंगी प्राणघातक असते. त्यामुळे पिकांवर किटकनाशकाची फवारणी करतांना काळजी घेणे आवश्यक आहे.
किटकनाशके हाताळतांना रबरी मोजे घालावे. किटकनाशकाचे द्रावण तयार करतांना काठी किंवा डव वापरुन पाण्यात निट मिळसावे. फवारणीचे द्रावण तयार करण्यापासून फवारणी पुर्ण होईपर्यंत डोळ्यावर चष्मा, हातामध्ये रबरी हातमोजे व तोंडावर मास्क अथवा उपरणे गुंडाळणे आवश्यक आहे. सर्दी, पडसे व ताप असल्यास फवारणी करु नये. फवारणीचे काम बालकावर सोपवू नये. फवारणी वारा शांत असतांना व वाऱ्याच्या दिशेने सकाळी किंवा सायंकाळी करावी. तीव्र उन्हात किंवा हवा असतांना करु नये.फवारणीचे
द्रावण तयार करण्यापासून पुर्ण होईपर्यंत फवारणी करणाऱ्या व्यक्तीने खाणे, पाणी पिणे, तंबाखू, धुम्रपान करु नये. कृषि विद्यापिठ तसेच उत्पादक कंपनीने शिफारस केलेल्या मात्रेप्रमाणेच किटकनाशकाचे द्रावण तयार करावे. कोणत्याही परिस्थितीत किटकनाशकाचे प्रमाण वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. फुटलेले किंवा मोडके स्प्रेपंप वापरु नये. चांगल्या प्रतिचा पंप व नोझल वापरावे. फवारणी शरीरापासून लांबवर करण्याची काळजी घ्यावी. नोझल साफ करतांना फुंकर मारु नये. फवारणी झाल्यानंतर साबनाने हात स्वच्छ धूवावे. डोके दुखणे, घाम येणे, मळमळ इत्यादी लक्षणे दिसल्यास फवारणी तात्काळ थांबवावी व फवारणी न झालेल्या मोकळ्या जागेवर सावलीमध्ये बसावे. किटकनाशकासोबत
दिलेल्या घडीपत्रिकेमध्ये दिलेली उपाययोजना करावी. त्रास होणाऱ्या व्यक्तीस मिठाच्या पाण्याचे द्रावण पिण्यास दिल्यास उलटीवाटे विष बाहेर पडते. डोळे चुरचुरत असल्यास चुकूनही डोळ्यांना हात लावू नये. बशीमध्ये स्वच्छ पाणी घेऊन त्यात डोळा बुडवावा व डोळ्याची उघडझाप करावी. असे पाणी बदलवून दोन तिन वेळा करावे व जवळच्या डॉक्टरकडे तात्काळ उपचार घ्यावा. डॉक्टरांना घडीपत्रिका व किटकनाशकाचा डबा दाखवावा, असे जिल्हा कृषि विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर