
रेशन धान्य घेण्यासाठी हेदुलिपाड्यावरच्या नागरिकांना पायपीट करावी लागते.
प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे ग्रामपंचायत अंतर्गत हेदुलीपाडा या गावातील नागरिकांना रेशन धान्य घेण्यासाठी चार ते पाच किलोमीटर पायी पायी जावे लागते व पावसाळ्यामध्ये धान्य भिजून जाते त्यामुळे या पाड्यातील नागरिकांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांची रेशन धान्य विषयी समस्या होती ती मांडली तात्काळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर तहसील ऑफिस येथे जाऊन दिनांक 7/7/2023 रोजी तहसीलदारांना निवेदनाद्वारे या गावची समस्या तात्काळ सोडवा असे तालुकाध्यक्ष जयवंत हागोटे यांनी तहसीलदार मॅडम यांना सांगितले तसेच या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन तहसीलदार मॅडम यांनी वेळुंजे गावचे उपसरपंच यांना फोन द्वारे हा प्रॉब्लेम सॉल करण्यासाठी फोन केला तसेच जवळपास असलेला रेशन दुकानदार त्यांना घेण्यास तयार असेल तर त्यांच्याकडे रेशन धान्य वाटप करण्यात देण्यात सांगितले उपस्थित संघटनेचे पदाधिकारी उत्तम लिलके, बुधा ढोरे, रोहिदास देशमुख, रमेश शेवरे, आदी उपस्थित होते.
Total Users : 10829