
आदिवासी ग्रामीण भागातील कोवळी भाजी सण मोठ्या उत्साहात साजरा….
प्रतिनिधी-दीपक भोये विक्रमगड
पालघर जिल्हातील आदिवासी बहुल विक्रमगड जव्हार मोखाडा वाडा तालुक्यातील आदिवासी भागात सर्वात पहिला येणार सण हा कोवळी भाजी चा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात ,नवीन पाण्याची नवीन मोड आणि पावसाळ्याची सुरवात याचा आनंद व्यक्त करण्यासाठी शेतकरी आपल्या पिकांची पेरणी पूर्ण झाल्यावर व पाऊस पडल्यानंतर जंगलात सर्वात पहिली राणभाजी उगवते ती भाजी जंगलात जाऊन घेऊन येतात व गावातील गावदेवता ,निसर्ग देवता यांना गावातील पुजारी शेंदूर लावतात व देवाला विनवती करून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो.
हा सण शक्यतो मंगळवार व रविवार या दिवसी हा उत्सव साजरा केला जातो.रविवार,सोमवार या दिवसी सकाळीच दिवसभरात महीला जंगलात कोवळी भाजी आणण्यासाठी जातात,पहील्या पावसाच्या सुरवातीला जे उगवते व जे प्रथम खाण्यास उपलब्ध होते अशी ही कोवळी भाजी निसर्गाने दिलेले वरदानच आहे.आणि त्याचा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव साजरा करतात ही भाजी संध्याकाळी घरोघरी शिजवली जाते आणि ही भाजी शिजुन झाल्यानंतर लहाण मुले ,मोठी माणसे घरोघरी जाउन कोवळी भाजी घ्या अशा एक संदेश प्रत्येक माणसाला देत असतात.
पहिला पाऊस एकदोन वेळा पडून गेला की रानात शेवळी, देहगडी, चाईचे वेल, भुईफोड, कोवळी भाजी,पेंडरा, लोती, करटोली अशा रानभाज्या रानात उगवतात. याच पार्श्वभूमीवर कोवळी भाजीचा सण ग्रामीण आदिवासी भागात साजरा केला जातो. हा सण कॅलेंडरप्रमाणे एखाद्या विशिष्ट तिथीलाच येतो असे नाही. पाऊस पडल्यानंतर कोवळी भाजी रानात उगवलीय का? हे पाहून गावातली माणसे कोवळी भाजीचा एक वार निश्चित करतात. बहुधा मंगळवारी सण धरण्याचा प्रघात आहे. या सणाला नवीन लग्ने होऊन सासरी गेलेल्या पोरी आवर्जून माहेरी आणल्या जातात. रानातून भाजी आणली की त्यातली थोडीशी भाजी गावच्या गावदेवीजवळ ठेवली जाते. नंतर घरात शिजवली की घरातल्या करंडीत ठेवलेल्या कुलदैवतांना त्यातला थोडा निवद (नैवद्य) दाखवून मग लेकी बाळींसह सगळेजण जेवायला बसतात. कोवळी भाजी हा सण आज पण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Total Users : 10829