
श्री अमितजी रोडगे यांच्या माध्यमातून आणि रोटरी क्लब वाडा यांच्या सौजन्याने अति दुर्गम भागात असलेल्या उज्जैनी केंद्रातील घायपातपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आज मदतीचा हात.
ji24news palghar
मिळाला तो रोटरी क्लब वाडा यांचा. अनेक शाळांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था असतात पण अतिदुर्गम भागात असलेल्या शाळांपर्यंत मदतीचा हात फार क्वचितच पोहोचतो. आणि अशाच अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना खरोखरच मदतीची खूप गरज असते. आणि विद्यार्थ्यांची ही गरज रोटरी क्लब वाडा यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा घायपातपाडा येथील विद्यार्थ्यांना शनिवार दिनांक 8/ 7/ 2023 रोजी स्कूल किटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्कूल किट मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा बघण्यासारखाच होता. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष माननीय श्री शशिकांत दुर्गुडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच ज्यांच्या सौजन्याने आणि प्रेरणेने मुलांपर्यंत स्कूल किट पोहोचली अस मोलाचं काम निरीक्षण करून मदत करणारे शिक्षण प्रेमी विद्यार्थी हित जपणारे व वडिलांच्या प्रेरणेने व आशिर्वादाने सेवा करणारे आपले शिवाजी नगर वाशी *माननीय श्री . अमितजी रोडगे रोटरी क्लब ऑफ वाडा सदस्य यांचे तसेच त्यांच्या सोबत असणारे सर्व रोटरी क्लब वाड्याचे सदस्य *यांचे जिल्हा परिषद शाळा तर्फे खूप खूप आभार व त्यांच्या कार्याला सलाम. असेच व्यक्तिमत्व आपल्याला आपले प्रतिनिधीत्व करण्यास अपेक्षित असते. तसेच याप्रसंगी श्री स्वप्निल रोडगे यांनी मुलांना मार्गदर्शन जे भाषण केलं त्या भाषणातून मुलांना नक्कीच खूप प्रेरणा मिळेल आणि आमच्या शाळेतील विद्यार्थी उद्या आपल्या देशाची चांगलेभावी नागरिक घडतील आणि त्यातूनच एखादा मोठा अधिकारी बनेल अशी आम्ही आपल्याला या निमित्ताने शाश्वती देतो. पुन्हा एकदा रोटरी क्लब वाडा यांचे खूप खूप आभार जिल्हा अध्यक्ष
अनिल शेलार
शिक्षक भारती पालघर…
Total Users : 10829