ji24news

आदिवासी बेरोजगार अभियोग्यता धारक डी. एड, बी.एड अभियोग्यता धारकांचा विधाभावनावर लॉंग मार्च….

आदिवासी बेरोजगार अभियोग्यता धारक डी. एड, बी.एड अभियोग्यता धारकांचा विधाभावनावर लॉंग मार्च…..


विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड ji24news


विक्रमगड – पालघर – शिक्षक भरती साठी गेल्या तीन वर्षांपासून आदिवासी डी. टी. एड, बी. एड कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन केली जातं आहेत.फेब्रुवारी 2023 मध्ये पवित्र पोर्टल च्या माध्यमातून शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा आयोजीत करण्यात आली. सदर परीक्षेचा निकाल लागून पाच महिने व्हायला आले परंतु अद्याप पवित्र पोर्टल चालू करण्यात आले नाही.
शालेय शिक्षण मंत्री यांनी नुकतीच 50 हजार शिक्षक भरण्याची घोषणा केली आहे.त्यात दोन टप्पे करून पहिल्या टप्यात 30 हजार पदे भरण्यास सरकार अनुकूल आहे.परंतु मंत्री हे नुसते घोषणा करत असून आता पर्यंत त्यांनी घोषणे पलीकडे पवित्र पोर्टल सुरु करण्यासाठी कोणतेही आदेश आयुक्त सूरज मांढरे यांना दिलेले नाही. त्यामुळे शासन आणि प्रशासन यात ताळमेळ दिसत नसून मंत्र्याच्या घोषनेला अधिकारी केराची टोपली दाखवत आहेत असा गंभीर आरोप समितीचे राज्यध्यक्ष दामू मौळे यांनी केला आहे.
24 जुलै 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर ते विधानभवन मुंबई येथे पायी लॉंग मार्चचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत नुकतेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना लॉंग मार्च बाबत निवेदन देण्यात आले आहे.
पवित्र पोर्टल तात्काळ सुरु करणे, अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागा एकच टप्यात (पहिल्या) 80% भरण्यात याव्यात, अनुसूचित जमाती विशेष पद भरती मधील रिक्त राहिलेल्या जागा भरणे, निवृत्त शिक्षकांना कंत्राटी न घेता त्या ठिकाणी कायम शिक्षक भरती करणे अशा मागण्यासाठी आदिवासी बेरोजगार अभियोग्यता धारक लॉंग मार्च मध्ये सामील होणार आहेत.

शासन नुसतं घोषणा करत आहे. पण भरतीला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. तात्काळ भरतीची प्रक्रिया सुरु करावी व आम्हाला न्याय द्यावा. आज बऱ्याच शाळावर शिक्षक नाहीत.त्यामुळे हा लॉंग मार्च आम्ही काढतोय.
-राजउपाध्यक्ष, रुपाली मेघा.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर