ji24news

21 व्या राज्यस्तरीय ज्युनिअर वुशू स्पर्धा व 20 व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर वुशू स्पर्धेत हिंगणघाटच्या विद्यार्थ्यांची अतुल्य कामगिरी..

21 व्या राज्यस्तरीय ज्युनिअर वुशू स्पर्धा व 20 व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर वुशू स्पर्धेत हिंगणघाटच्या विद्यार्थ्यांची अतुल्य कामगिरी

प्रा.दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी – वर्धा

दिनांक 14 ते 17 जुलै 2023 ला अमरावती येथे घेण्यात आलेल्या वुशू या स्पर्धेत The Fighter Planet Club Hinganghat चे खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करून 5 पदक पटकाविले सब-जुनियर वयोगटात ताओलु या इव्हेंटमध्ये आरुषी लेडे यांनी नान चाकु चालवुन कास्य पदक व साँसू या इव्हेंटमध्ये जवेरिया शेख ,सायली जामकुठे, श्लोक नव्हाते या तिघांनी कास्यपद तसेच ज्युनियर वयोगटात रंजीत राऊत यांनी सुद्धा कास्य पदक जिंकले .
वुशू एक मार्शलआर्ट प्रकाराचा खेळ आहे ज्यात ताओलु एक ( कुंफू चे प्रकार म्हणजे शस्त्र कला होय ) व सांसू म्हणजे ( लढण्या चे प्रकार आहे जसे थाईबॉक्सिंग आणि कुस्ती याचा मिक्स प्रकार म्हणजे वुशू )
खेळाडू करीता शासकीय नोकरीत रखीव 5% कोटा असतो शासन मान्यताप्राप्त असणारा हा खेळ एशियन गेम्स पर्यंत पोहोचला आहे व वेगाने जगात प्रसिद्धी च्या मार्गेवर वळून राहिला. अनेक खेळाडूनी या वर्षी या खेळाचे आरक्षणाचे लाभ घेऊन पोलीस-भरती मध्ये व रेल्वे मध्ये, आर्मी, अशा सरकारी नोकरीमध्ये खेळाडू लागलेले आहेत.
आपणही हा खेळाचा फायदा घेऊन सरकारी नोकरी साठी पात्र ठरू शकाल
वुशू या खेळाचे हिंगणघाट येथील The Fighter Planet Club तर्फे प्रशिक्षण दिल्या जाते
प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी संपर्क क्रमांक
9860066118 यावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशिक्षकांतर्फे करण्यात आले आहे
खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय आपले आई वडील व कोच श्री सुशांतसिंह गहेरवार, श्री पर्वेज खान, श्री आशिष वांढरे, श्रीमती नम्रता दुबे, श्री फैजान शेख ,श्री कबीर महेशगौरी व वुशू स्फोट असोसिएशन वर्धा याचे अध्यक्ष श्री निलेश राऊत यांनी पण उत्कृष्ट मार्गदर्शन केले
त्याचप्रमाणे श्री जेठानंद जी राजपूत श्री रमेश धारकर, श्री विनोद कुसुरकर श्री सतीश तिमांडे, श्री बंडू खांडरे, यांनी आश्वासन दिले कि वर्धा जिल्हा येथे चांगले खेळाडू विुशू या खेळात निर्माण होऊ शकतात याची शाश्वती दिली. खेळाडूंच्या कौशल्यावरून त्यांच्या प्रशिक्षकांची सुद्धा प्रचिती झाली एक प्रशिक्षक आपल्या खेळाडू मागे नक्कीच भर देत आहे याचे जिवंत उदाहरण आपणास पाहण्यास मिळाले. क्रीडा क्षेत्रासाठी नेहमीच चांगले सहकारी सहकार्य करण्यास तत्पर असतात हे सुद्धा यावेळी निदर्शनास आले

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर