ji24news

रस्त्या अभावी गरोदर महिलेचा जीवघेणा प्रवास..

रस्त्या अभावी गरोदर महिलेचा जीवघेणा प्रवास”.

प्रतिनिधी:दीपक भोये विक्रमगड


पालघर जिल्ह्याच्या जव्हार , मोखाडा, विक्रमगड या दुर्गम भागात ग्रामीण गावपाड्यांना जोडणारे रस्ते आणि पूल नसल्याने नागरिकांना वाहत्या नद्यांमधील पाण्याच्या धोकादायक प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याच वारंवार उघड होतंय . मोखाडा तालुक्यातील कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास चार ते पाच पाड्यांना जोडणारा पिंजाळ नदीवर पूल नसल्याने येथील नागरिकांना वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याच धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा उघड झाल आहे.

कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील शेंड्याचा पाडा, आंबे पाडा , रायपाडा आणि जांभूळपाडा या पाड्यांमधील नागरिकांना पावसाळ्यात नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय . या पाड्यांची लोकसंख्या 500 पेक्षा ही अधिक आहे . मात्र गावाबाहेर पडण्यासाठी येथील ग्रामस्थांना पिंजाळ नदी पार करावी लागत असून या नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते . पावसाळ्यात चारही महिने पिंजाळ नदी दुधडी भरून वाहत असून या काळात गावात शिक्षक ही पोहोचू शकत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशीही खेळ सुरू आहे . तर दुसऱ्या बाजूला गावात कोणी आजारी पडल्यास लाकूड आणि चादरीच्या साह्याने डोली करून येथील रुग्णांना लाकडी फळीच्या आधारावर नदी पार करावी लागते .

मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिंजाळ नदीवर पूलाची मागणी होत असून याकडे प्रशासन आणि सरकार मात्र डोळेझाक करत असल्याच चित्र आहे. त्यामुळे लवकरात लवकर पिंजाळ नदीवर पूल उभारून शेंड्याचा पाडा , आंबे पाडा , रायपाडा आणि जांभूळपाडा या गावातील नागरिकांना गावा बाहेर पडण्यासाठी दिलासा द्यावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे .

पालघर जिल्ह्यात आजही शेकडो गावपाड्यांवर जाण्यासाठी मुख्य रस्ते नाहीत . त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना गावाबाहेर ये जा करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतोय . मुंबई ठाणे या महानगरालगत असलेल्या पालघर जिल्ह्यात हे भीषण वास्तव दिवसेंदिवस उघडत होत असून सरकार याची दखल कधी घेणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय .

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर