
रेड अलर्ट! वर्धा जिल्ह्यात मुसळधार, शाळांना सुट्टी, लोकांचे स्थलांतर, वीजबळी
प्रा.दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी वर्धा
वर्धा जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने थैमान माजविले असून अनेक गावांत पुराचे पाणी शिरले आहे. हिंगणघाट तालुक्यात कुंभी येथे २५ घरात नाल्याचे पाणी शिरल्याने प्रशासनाने घरातील सर्वांना लगतच्या शाळेत स्थलांतरित केले. देवळी तालुक्यात सरुळ येथे यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी वर्धा राळेगाव मार्ग बंद पडला. दरम्यान आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने थैमान माजविले असून अनेक गावांत पुराचे पाणी शिरले आहे. हिंगणघाट तालुक्यात कुंभी येथे २५ घरात नाल्याचे पाणी शिरल्याने प्रशासनाने घरातील सर्वांना लगतच्या शाळेत स्थलांतरित केले.
देवळी तालुक्यात सरुळ येथे यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. परिणामी वर्धा राळेगाव मार्ग बंद पडला. दरम्यान आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
बुधवारी सायंकाळी गीरड येथे शेतात वीज पडल्याने दुर्गा ज्ञानेश्वर जंभुळे ही महिला ठार झाली. तसेच याच शेतात काम करणाऱ्या पाच महिला जखमी झाल्यात. त्यांना समुद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. देवळी तालुक्यातील आंजी ते पिंपळगाव मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे. तसेच आंजी ते अंदोरी मार्गावरील पुलावरूनदेखील पाणी वाहत आहे. तसेच गंगापूर पुलावरून पाणी वाहत आहे. त्यापैकी गंगापूर गावाचा संपर्क तुटला आहे व इतर गावांना पर्यायी मार्ग आहे. समुद्रपूर तालुक्यातील वासी जवळील पुलावर पाणी असल्याने नंदोरी वासी रस्ता सद्या बंद आहे.
Total Users : 10829