
जव्हार तालुक्यातील ओझर कुंडाचापाडा येथील वसंत भोवर यांच्या घराला शॉक सर्किट मुळे आग लागून घरातील सर्व साहित्य जळून प्रचंड नुकसान.
विक्रमगड प्रतिनिधी-दीपक भोयेji24news
जव्हार तालुक्यातील ओझर कुंडाचा पाडा येथील वसंत भोवर यांच्या घराला आज दुपारी अचानक विजेच्या शॉक सर्किट मुळे आग लागून घरातील t v कपाट व इतर सर्व घरातील सामानाला आग लागून जळून प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच त्यांचे घरातील कपाटात असलेली सर्व शैक्षणिक कागदपत्र व घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे सदर घटना हे आज दुपारी अचानक घरात कोणी नसताना लाईट ये जा करत होती त्यामुळे अचानक विजेच्या वायर मुळे घरात आग लागून झाले असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली असून सदर गरिब व्यक्तीचे घरातील सर्व कागदपत्रे व सामान जळून त्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना तात्काळ शासनाने पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आले आहे.
Total Users : 10829