
खडतर परिस्थितीतून विद्यार्थ्याचा राज्य राखीव पोलीस दल मध्ये निवड…..
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाडji24news.
विक्रमगड – विद्यार्थी हा विविध क्षेत्रातून यशस्वी होत असतो त्याच पद्धतीने विविध परिस्थितीतून यशस्वी होत असतो अश्याच प्रकारे मनाची जिद्ध ठेऊन आणि मेहनत करून काही वेळा अयशस्वी ठरले तरी सुद्धा हार न मानता त्याला सामोरे जाऊन आणि राज्य राखीव पोलीस दल मध्ये यश प्राप्त करून आपल्या परिवाराचे, गावाचे तसेच तालुक्याचे नाव उंचावले आहे.
अश्या या विद्यार्थ्याचे नाव आहे आनंद सखाराम पडवळे, गाव ब्राम्हण गाव, तालुका वाडा, जिल्हा पालघर.
या विद्यार्थ्याने गावामध्ये राहून आणि खूप मेहनत मनापासून करून आणि त्याचे स्वतःचे स्वप्न पूर्ण केले या यशाला त्याचे मैत्री वर्गाने तसेच ग्रामस्थांनी त्याचे मनापासून अभिनंदन केले आणि त्याच पद्धतीने तालुक्यातून अभिनंदनचे वर्षाव पडत आहे.
Total Users : 10829