
वर्धा जिल्ह्यात 590 घरकुलांना पालकमंत्री फडणवीस यांची मंजुरी…
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे यासाठी रमाई आवास योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन 2023-24 या वर्षासाठी उपमुख्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 590 घरकुले मंजूर केली आहे.
या लाभार्थ्यांना बांधकामासाठी 8 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक गरीब कुटुंब आपले स्वत:चे पक्केघर बांधू शकत नाही. अशा कुटुंबांना स्वत:चे घर उपलब्ध व्हावे यासाठी शासन विविध घटकांसाठी घरकुलाच्या विविध प्रकारच्या योजना राबवितात. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी राबविण्यात येत असलेली रमाई आवास ही एक अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेने या घटकातील हजारो गरीब कुटुंबांना हक्काची पक्की घरे उपलब्ध करून दिली आहे.या योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागामधील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या जागेवर 269 चौरस फुटाचे पक्के घर शौचालयासह बांधून देण्यात येते. या (Guardian Minister Fadnavis) योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केली जाते. घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय खर्चाची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यात ग्रामीण भागात घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना 1 लाख 32 रुपयांचे अनुदान दिले जातात. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या 590 घरकुलांमध्ये आर्वी तालुक्यातील 100 घरकुलं, आष्टी तालुक्यातील 71 घरकुले, हिंगणघाट तालुक्यातील 49, कारंजा तालुक्यातील 85, सेलू तालुक्यातील 80, समुद्रपूर तालुक्यातील 100, वर्धा तालुक्यातील 50 तर देवळी तालुक्यातील 55 घरकुलांचा समावेश आहे.
ज्या लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली त्या लाभार्थ्यांना मंजुरीबाबत कळवून त्यांच्या घरकुलाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याच्या सुचना Guardian Minister Fadnavis पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला दिल्या आहेत. उर्वरित घरकुलांचे प्रस्ताव पंचायत समितीनिहाय मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश देखील रमाई आवास घरकुल (ग्रामीण) समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
Total Users : 10829