ji24news

जि.प. च्या विद्यार्थ्यांनी शेतात उतरून केले भात लागवडीचे प्रात्यक्षिक…

जि.प. च्या विद्यार्थ्यांनी शेतात उतरून केले भात लागवडीचे प्रात्यक्षिक…...

प्रतिनिधी-ji24news दीपक भोये विक्रमगड.

विद्यार्थ्यांना लहानपणापासून शिक्षणासोबत शेती आणि श्रमाचा अनुभव मिळावा म्हणून जि.प. शाळा गुरवपाडा (सवादे) शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून भात लागवडीचा अनुभव घेतला.
शाळेत कार्यानुभव हा विषय असतो. त्याअंतर्गत उत्पादक उपक्रमात अन्न हा घटक आहे. त्या अन्नाचे महत्त्व विदयार्थ्यांना शिक्षकांनी पटवून देवून आपल्या आहारातील महत्वाचे व प्रामुख्याने कोकणात पिकवला जाणारा तांदूळ. व तो ज्यापासून मिळतो ते भात याची प्रत्यक्ष लागवड शेतात कशी करावी याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन केले. आपल्या परिसरातील मुलांना ही बाब जरी नवीन नसली तरी शेतीची कामे, धान्य पिकवण्यासाठी करावी लागणारी मेहनत किती असते हे मुलांना समजून सांगता आले. त्यामुळे शिक्षणाबरोबर शेतीचे ज्ञान, कष्ट केल्यानेच शेतकरी शेतात धान्य पिकवू शकतो याची प्रचितीही त्यांना मिळाली. त्याद्वारे श्रमाचे मूल्य विदयार्थ्यांना पटवुन देता आले. यावेळेस शाळेतून घडणाऱ्या या उपक्रमाने मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
सदर उपक्रमात शाळा व्य. समितीचीही मोठी मदत झाली व विद्यार्थ्यांना भात लागवडीचा अनुभव घेता आला.

विद्यार्थ्यांना शेतात उतरून भात लागवड करताना मी व सरांनी त्याचे महत्त्वही त्यांना करून दिले. व प्रत्यक्ष लागवड केल्याने, शेतात उतरल्याने मुलांना त्याचा खूप आनंद झाला. – श्री.रमेश गिरंधले शेतकरी, सवादे

कार्यानुभव विषयांतर्गतअन्न हा एक उपक्रम आहे.त्यात अन्न ज्या घटकांपासून मिळते. त्यापैकी भात ह्याची प्रत्यक्ष लागवड. त्यापूर्वी त्याची पेरणी, लावणी आणि धान्य कसे येईल याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
– श्री. केशव भोये, सहशिक्षक शाळा – गुरवपाडा

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर