
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून घानवळ गावच्या तरुणांनी बुजवले रस्त्यावरील खड्डे…
जोहार इंडिया 24 न्यूज.
घानवळ – दि.9 ऑगस्ट रोजी घानवळ गावच्या तरुणांनी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून घानवळ ते पिंपळपाडा रस्त्यावरील खड्डे बुजवून या तरुणांनी आदिवासी समाजाला अभिमान वाटेल असं आदर्शवत काम केलं आहे.
घानवळ ते पिंपळपाडा रस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे आधीच वीस दिवसापासून मोखाडा ते बालद्याचापाडा अशा मार्गाने होणारी बस वाहतूक बंद असून त्यामुळे हिरवे आश्रमशाळेत जाणारे विद्यार्थी,आजारी व्यक्ती आणि अबाल- वृद्धांना मोखाडा येथे जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग – मोखाडा यांना पत्रव्यवहार केला असता रस्त्यावरील डांबराचा थर वाहून गेला असून पाऊस असल्यामुळे रस्ता दुरुस्त करता येणार नाही असा सोईचा युक्तिवाद करून ग्रामस्थांना पत्रव्यवहार केला आहे. हाच धागा पकडून घानवळ येथील सचिन वझरे,निवृत्ती भांगरे,नामदेव खरपडे,रोशन गाडर या तरुणांनी जिओ कंपनीच्या केबलकामामुळे रस्त्यावर निर्माण झालेले तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारे आणि पर्यायाने अपघातास निमंत्रण देणारे मोठं मोठे खड्डे श्रमदान करून बुजवले आहेत. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने घानवळ गावच्या तरुणांनी रस्त्यावरील खड्डे बुजवल्यामुळे त्यांचे समाजबांधव कौतुक करत आहेत.
पिंपळपाडा ते घानवळ रस्त्याच्या प्रचंड दुरावास्थेकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन सोईस्करपणे का दुर्लक्ष करत आहेत ? हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.
Total Users : 10829