
राज्यात पसरलीय डोळ्यांची साथ..
विक्रमगड प्रतिनिधी .ji24news प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – आजार हा माणसाला हानिकारक असतो आणि तो झाला कि माणसाला खूप त्रास सहन कराव लागत असते. या मध्ये बरेच असे आजार येतात डोके दुःखी, ताप, सर्दी, खोकला, टीबी, कॅन्सर, कोरोना, असे अनेक आजार आहेत त्या पासून माणूस हा बळी पडतो. आणि त्यासाठी काळजी घेणे खूप गरजेचे असते.
प्रत्येक वर्षाला एखादा आजार हा पसरला कि इतरांना लागू होतो आणि तो लागू झाला कि काही असे नियम पाळावे लागतात आणि त्याची काळजी घ्यावी लागते.
अश्याच प्रकारचा आजार हा डोळ्यांची साथ म्हणून पसरलेला आहे यासाठी होणारे त्रास ते माहिती असणे खुप गरजेचे असते ते म्हणजेच लक्षणे कोणती आढळून येतात तर डोळ्याला खाज येणे, चिकटपणा जाणवणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लालसर होणे,डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे आणि म्हणून त्यासाठी घ्यावायची काळजी डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुणे, इतर व्यक्तीच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीचा वापर ऐकमेकांनी करू नये ही काळजी घेणे खूप महत्वपूर्ण बाब आहे आणि आपले डोळे पुसू नका, डोळ्यांना सतत स्पर्श करू नका, घरा बाहेर जाताना गॉगलचा वापर करा संसर्ग झाल्याने लक्षात येताच नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या
Total Users : 10829