
नूतन विद्यामंदिर उमरोळी, शाळेत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा .
पालघर ;-ji 2 4 news .
सकाळ अधिवेशन मध्ये कार्यक्रमाचे नियोजन श्री.भुसारा सर आणिश्री.संखे सर यांनीकरून विविध स्पर्धा आयोजित केल्या यावेळी उपस्थित ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व उमरोळी गावचे सरपंच माननीय श्री. प्रभाकर पाटील, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष माननीय श्री .राजेश पाटील.व संस्थेचे आणि शालेय शिक्षण समितीचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते. त्याच बरोबर शाळेतील मुख्याध्यापक श्री. संजय घरत सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ.म्हात्रे मॅडम यांनी केले, विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा याविषयी भाषण केली. निबंध, रानभाज्या यामध्ये मान्यवरांनी आदिवासी दिना विषयी माहिती विद्यार्थ्यांना माहिती दिली .जागतिक आदिवासी दिनानिमित्त चांगला कार्यक्रम झाल्याबद्दल सर्व सन्माननीय पदाधिकारी व सहकाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार! व्यक्त केले.

दुपार अधिवेशन सौ.सीमा सांबरे मॅडम आणि श्री. हेमंत घाटाळ सर यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुंदर रित्या विविध कार्यक्रमांचे नियोजन केलं.. आणि खूप छान पद्धतीने कार्यक्रम घडवून आणला स्वतः विद्यार्थ्यांना बक्षीस दिली. निबंध स्पर्धा . वारली चित्रकला स्पर्धा .वेशभूषा तारपा नाच घेऊन खूपच सुंदर असा कार्यक्रम झाला म्हणून त्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन.. केले .यावेळी मुलांनी धरती आबा, बिरसा मुंडा यांची माहिती देऊन वारली चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रानमेवा विविध वनस्पतीचे माहिती. प्रदर्शन -विविध अवजारे ठेवून विद्यार्थ्यांनी माहिती मिळवून आनंद व्यक्त केला . . तर यावेळी जागतिक आदिवासी दिना विषयी ग्रामीण शिक्षण संस्थेचे सरचिटणीस श्री .भूषण पाटील संस्थेचे कार्याध्यक्ष -श्री. नितीन वझे यांनी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन माहिती दिली शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. कांचन पाटील सौ .रोहिणी पाटील व सौ .उज्वला चौधरी. सौ. प्रियंका पाटील कर्मचारी श्री .मंगेश घरत इत्यादी उपस्थित होते.

Total Users : 10829