
पोलीस मित्रांकडून सांत्वन आणि आर्थिक मदत करून वाहिली श्रद्धांजली..
जव्हार : ji24news. प्रदीप कामडी
मोखाडा तालुक्यातील कुडवा येथील पोलीस अधीक्षक सो. ए.टी.सी विभाग पालघर येथे पोलीस नाईक या पदावर कार्यरत असणाऱ्या कै. गंगाराम चिमा राऊत यांचे दि.०२ ऑगस्ट २०२३ रोजी अचानक हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
कुटुंबातील एका कर्त्याव्यक्तीचे व सर्व कुटुंबाची सगळी जबाबदारी त्या व्यक्तीवर असताना असा अपघाती निधन झाल्यावर त्या कुटुंबातील सगळ्या लहान थोर माणसांच्या मनावर किती खोलवर परिणाम होत असेल याची कल्पनाही मनाला खुप वेदना देते. ती व्यक्ती आपल्यातून निघून जाते त्यानंतर सर्वजण आपापल्या जबाबदारी च्या ओझ्याखाली सर्व विसरून जातो हा निसर्गनियम आहे. पण याला छेद देत त्याच्या २००८ च्या बॅचमेट पोलीस मित्र अजित वाढू, तुकाराम कुंभार, रामदास चव्हाण, रामचंद्र पवार, जानू वातास, मंगेश बसवंत, गजानन आमले, सुंदरसिंग वसावे, दिनेश भुरकूड, संपत माळी त्यांच्या मुळगावी कुडवा मोखाडा येथे जाऊन दशक्रिया विधी ला उपस्थित राहून कुटुंबियांचे सांत्वन केले.
आपल्या मित्राच्या कुटूंबावरील कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगरात मदत म्हणून त्यांच्या सन २००८ च्या सर्व बॅचमेट, ठाणे शहर आयुक्तालय व लातूर बाभळगाव पोलीस ट्रेनिंग चे पोलीस सहकारी मित्रांकडून तीनही मुलांच्या नावे प्रत्येकी ५० हजार रुपये एफडी म्हणून व त्यांच्या पत्नीला १७ हजार रुपये रोख असे एकूण १७७००० रुपये मदत म्हणून दिली. आपल्या मित्राचं असं अचानक जाण्यान त्यांच्या कुटूंबावर कोसळलेल्या दुःखात प्रत्येक्ष सहभागी होऊन कुटुंबाला दुःखातून सावरण्यासाठी मानसिक व आर्थिक मदत करून खऱ्या अर्थाने आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली. या त्यांच्या मित्रासाठी केलेल्या पोलीस मित्रांनी मदतीची चर्चा सर्वत्र होत आहे.
Total Users : 10829