
जव्हार तालुक्यातील पत्रकार प्रमोद मौळे यांना अक्षराज मीडियाच्या वतीने “उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार” प्रदान…
पालघर प्रतिनिधी: ji24news.-सौरभ कामडी
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या दैनिक अक्षराज वृत्तपत्राने केवळ आपल्या लक्ष लक्ष वाचकांच्या विश्वास आणी भकम पाठबळावरच द्वितीय वर्ष पूर्ण करून,तिसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहोत त्याचाच एक आनंदोत्सव म्हणून सर्व वाचक,लेखक व हितचिंतकांसाठी दैनिक अक्षराज वृत्तपत्राचा द्वितीय वर्धापनंदिन हा सोमवार दि. १४ ओगस्त २०२३ रोजी साजरा करण्यात आला यावेळी संपादक विनोद कैलास गोरे, सह संपादक प्राजक्ता चव्हाण गोरे, राज्य समन्ययक, सहायक महानगरपालिका आयुक्त,पुणे सुरेखा भणगे, पोलीस उपनिरीक्षक येरवडा पोलीस ठाणे प्रदीप सुर्वे, विधानसभा सह समन्वयक शिवसेना (उ.बा.ठा) आर.जी.हुले, मान्यवरच्या उपस्थिती मध्ये अक्षराज वृत्तपत्राच्या वतीने महारष्टातील १० पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. दैनिक अक्षराज वृत्तपत्राच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्ताने, सामाजिक क्षेत्रात लोकांचे सामाजिक प्रश्न अक्षराज मीडियाच्या माध्यमातून सोडवणारे अक्षराज मीडिया कुटुंबाचे सदस्य, श्री. प्रमोद मौळे यांना अक्षराज मीडिया च्या वतीने “उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार” सदर पुरस्कार हा वर्धापन दिनीनी प्रदान करण्यात आला आहे त्याबद्दल
श्री.प्रमोद मौळे यांचे मनःपूर्वक अभिनंदनाचा..! व कौतुकाचा वर्षाव हा राज्य भरातील वाचकाकांडून व तसेच मित्र परिवार यांच्याकडून होत आहे.
Total Users : 10829