
सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात हुतात्मा दिन देशभक्तीपर गीताने साजरा …
वार्ताहर-ji24news प्रा .सोमनाथ सातपुते
सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात सालाबाद प्रमाणे याही वर्षी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करून हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा गोपीनाथ नागरगोजे सर होते.कार्यक्रमाची सुरुवात पालघर जिल्ह्यातील पाच शहीद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहून व दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.श्री अरुण सुरती यांनी प्रास्ताविक केले तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विना अनुदानित विभागाच्या उप प्राचार्या प्राध्यापिका सौ प्रीती फणसेकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.सदर स्पर्धेसाठी 21 सोलो गीत व नऊ ग्रुप सहभागी झाले होते.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. दिलीप तेलमोरे, प्रा.प्रविणा कोचरेकर आणि प्रा.फातिमा अन्सारी यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वनित पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.योगेश अक्रेकर यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या कार्याध्यक्षा प्रा.अनिता लोहार, प्रा.आनंद जाधव, प्रा.किरण थोरात यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Total Users : 10829