
15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने बेरोजगार युवक व युवतींना मिळवून दिला रोजगार…
प्रा.दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
वर्धा जिल्ह्यातील वडनेर – दारोडा टोल प्लाझा येथे ग्रामीण भागातील युवक व युवती ज्यांना रोजगार नव्हता अशा ९५ मुला – मुलींना कामावर घेऊन रोजगार उपलब्ध करून दिले ,त्यामुळे ते त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम झालेत,
आज दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने टोल प्लाझा मॅनेजर मा. श्री शिवराज सिंग जाधव व गौरवजी श्रीवास्तव यांचा सत्कार श्री गुरुदयालसिंग सोरनसिघ जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वर्धा जिल्हा यांच्या हस्ते करण्यात आले,
टोल प्लाझा मॅनेजर मा शिवराज सिंग जाधव साहेब व मा गौरवजी श्रीवास्तव साहेब यांनी ग्रामीण भागातल्या मुली व मुले यांनी आज नियुक्तीपत्र देऊन कामावर रूजू करून घेतले
बेरोजगार युवक व युवतींसमोर अनेक प्रश्न होते उदरनिर्वाह कसे करायचे ,कुटुंबाचे प्रश्न कसे सोडवावे वडनेर दारोडा टोल प्लाझाचे मॅनेजर साहेबांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार आज सोहळा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वर्धा जिल्हा
गुरुदयालसिंग जुनी मित्रपरिवाराकडून आयोजित करण्यात आला ,वडनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व सदस्यांनी वडनेर दारोडा टोल सर्व पाथ कंपनी चे गौरव श्रीवास्तव सर, शिवराज जाधवन सर NHAI Invit कंपनी चे मलखित सिंह सर,निखिल पांडा सर,संजय भादोडिया सर, चेअरमन, मॅनेजर यांचे आभार व्यक्त केले या सत्कार सोहळा कार्यक्रमांमध्ये उपस्थित मा श्री गुरुदयालसिंग जुनी ग्रामपंचायत सदस्य वडनेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वर्धा जिल्हा, मा श्री प्रशांत भाऊ दरोडे, मा श्री महेंद्रभाऊ महाजन वर्धा जिल्हा शिवसेना संघटक , मा श्री दिनेश भाऊ चंदनखेडे, मा श्री विजुभाऊ पडोळे, मा श्री आकाश भाऊ अढाळ, मा शरदभाऊ कुरसंगे तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा श्री विजुभाऊ कटारे, मा श्री विजुभाऊ लाटकर, मा श्री भोजराज तुमाने, मा श्री अमोल कटारे, मा श्री कैलास तूमाने, व 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस अमृत महोत्सव निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा व महिला व पुरुष कर्मचारी मित्रपरिवार शेकडोच्या संख्येने उपस्थित होते

Total Users : 10829