ji24news

नी. मु. घटवाई विद्यालयाची साक्षी भालेराव पोस्टर्स स्पर्धेत द्वितीय…

नी. मु. घटवाई विद्यालयाची साक्षी भालेराव पोस्टर्स स्पर्धेत द्वितीय…
राहुल दुरतकर तालुका प्रतिनिधी ji24news- हिंगणघाट

वडनेर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन गटविकास अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती हिंगणघाट द्वारा वर्ग 5 ते 12 च्या विद्यार्थ्यांकरिता करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये नी. मु. घटवाई विद्यालयाची विद्यार्थिनी कु. साक्षी विजयराव भालेराव हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. हिंगणघाट विधानसभा मतदार संघाचे आमदार समीर कुणावर यांच्या हस्ते तिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन हिंगणघाट तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच सर्व माध्यमांच्या शाळांकारिता करण्यात आले होते. राष्ट्रीय एकात्मता व अखंडता राष्ट्रीय पुरुष ,क्रांतिकारक यांची वेशभूषा या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. साक्षीने काढलेले थोर पुरुषांचे चित्र हे स्पर्धेचे आकर्षण ठरले व साक्षीने स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. यापूर्वीही तिने विविध चित्रकला स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. साक्षीला शाळेतील कलाशिक्षक प्रशांत बोरकर यांनी मार्गदर्शन केले.
तिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल लोक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र डागा, सचिव रोशन डागा, मुख्यध्यापक राजेश सातपुते, उपमुख्यध्यापक रविंद्र गोडे, पर्यवेक्षिका मनिषा चव्हाण, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी अभिनंदन तसेच कौतुक केले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर