
गरोदर महिलेला रस्ता नसल्याने डोली करून न्यावे लागले दवाखान्यात…
प्रतिनिधी ji24news- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर.
एकीकडे शासन आपल्या दारी सारखे कार्यक्रम गावोगावी घेत आहेत सरकारी योजना गावोगावी पोहोचवण्याचा धावा करत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यांमध्ये मात्र आजही रस्तेच पोहोचले नाही अजून त्यामुळे आदिवासी बांधवांना रस्त्या अभावी पायपीट करावी लागते त्यातच त्रंबकेश्वर तालुक्यातील हरसुल परिसरातील खैरापाली ग्रामपंचायत अंतर्गत माचीपाडा येथील सरला न्यानेश्वर बामणे गरोदर महिलेचे दिवस भरत आल्याने महिलेच्या पोटात दुखायला लागले होते. तसेच पेन आल्याने 15 ऑगस्ट ला आशा वर्कर आणि महिलेचे पती व महिला यांनी डोली करून 3 किलोमीटर प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणापाडा येथे पोहोचवले डॉक्टरांनी गरोदर महिलेला तपासले व डिलिव्हरी होण्यास थोडे दिवस बाकी आहेत असे डॉक्टरांनी गरोदर महिलेच्या पतीला सांगितले गरोदर महिला व बाळ व्यवस्थित असल्याने 16 ऑगस्टला घरी सोडण्यात येणार आहे. ही घटना WhatsApp च्या माध्यमातून मिळताच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष जयवंत हागोटे यांनी तेथील आशा वर्कर यांच्याशी संपर्क साधून विचारपूस करण्यात आली.
Total Users : 10828