
नॅशनल हायवे वरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावण्यात आले प्रशासनाला जाग येण्यासाठी मनसे आक्रमक..
तालुका प्रतिनिधी -ji24news हिंगणघाट राहुल दुरतकर
आज दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी माननीय श्री राज साहेब ठाकरे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या आदेशानुसार आणि श्री किशोर भाऊ सरायकर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री शंकर भाऊ पोटफोडे वर्धा जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात श्री रमेश घंगारे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष ,यांच्या उपस्थितीत ,मनसे विधानसभा क्षेत्र हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे यांच्या वतीने टोल प्रशासनाला नॅशनल हायवे जाम हिंगणघाट ते दारोडा टोल हद्दीतील या रोडवरील पडलेले खड्डे येत्या १५ दिवसात बुजवण्यात यावे याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे खड्ड्यामध्ये कलोडे चौक हिंगणघाट ते टोल नाका दारोडा इथ पर्यंत खड्ड्यामध्ये बेशरमांची झाड लावण्यात आले आणि १५ दिवसाच्या कालावधीमध्ये खड्डे न बुजवल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे टोल वसुली करू देणार नाही व तसेच तीव्र आंदोलन करण्यात येईल असा मनसे तर्फे
इशारा निवेदन देतेवेळी
श्री जयंता कातरकर हिंगणघाट तालुकाध्यक्ष, जितेंद्र रघाटाटे वाहतूक सेना सरचिटणीस हिं विधानसभा ,सचिन भडे हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष, पवन तडस ग्रामीण तालुका उपाध्यक्ष, विलास हांडे हिंगणघाट शहराध्यक्ष, आदर्श भोयर हिंगणघाट शहराध्यक्ष ,सतीश गुरनुले सर्कल अध्यक्ष, राजू सराटे, रुपेश लांबाळे ,सचिन कोसले ,प्रशांत तिजारे, अमित मेश्राम, पवन ससाने, अनिकेत मडावी ,बालू चांदुरे ,शुभम पुडके, अनिल गुरनुले ,रोशन चतुरकर, इत्यादी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

Total Users : 10829