
संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आमदार विनय कोरे – सावकर यांच्या हस्ते लाभ प्रमाणपत्राचे वाटप .
शाहूवाडी तालुका प्रतिनिधी ji24news,आनंदा तेलवणकर
शाहूवाडी:तहसील कार्यालय शाहूवाडी यांनी तालुक्यातील अडीच हजाराहून अधिक पेन्शनधारकांना या तीन माहिन्यात पेन्शन मंजूर पत्रे दिल्याने तहसीलदार कार्यालय शाहूवाडी यांचे कार्य गौरवास्पद असल्याचे आ. कोरे बोलताना म्हणाले.
यावेळी दिव्यांग, निराधार यासारखे पेन्शन पासून वंचित असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना पेन्शन लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी सांगितले. यावेळी सोनुर्ले ते येळवण जुगाई येथील 127 लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर आदेशाचे वाटप केले. यावेळी माजी बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील – पेरीड कर, तहसीलदार रामलिंग चव्हाण,बाबा लाड,सरपंच मनीषा पोवार, मंडळ अधिकारी राजेंद्र सुतार, माजी उपसरपंच युवराज पाटील, नामदेव पोवार,रामचंद्र पाटील,उपसरपंच प्रभाकर पाटील – माळापुढे,ग्रामसेवक राहूल हंकारे, ग्रा. प. सदस्य सर्जेराव पाटील यांसह सर्व सरपंच,तलाठी,पोलीस पाटील,कोतवाल व जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपाथित होते. स्वागत व आभार नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांनी मानले.
Total Users : 10829