
वडणेर येथे प्रवाशी निवारा व प्रसाधनगृह व पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची प्रवाशी व विद्यार्थ्यांची मागणी
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वडणेर गावातून पांढरकवडा ते हिंगणघाट भागात जाणाऱ्या प्रवाशांना वडणेर गावात बसथांबा व प्रसाधनगृह नसल्याने भर उन्हात व संतधार पावसात ताटकळत थांबण्याची वेळ आली आहे. प्रवाशांना बसथांब्याअभावी उन्हातान्हातही थांबावे लागत आहे.
विशेषतः वडणेर परिसरातील आजनसरा,हिवरा,फुकटा,एरणगाव,गांगापूर व इतर ठिकाणांहून विविध कामांसाठी हिंगणघाट शहरात जात असतात. याबरोबरच बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांची सतत ये-जा असते. मात्र, बसथांबा नसल्याने प्रवाशांना ऐन उन्हाळ्यात ऊन्हापासून बचाव करण्यासाठी व पावसाळ्यात पाण्यापासून रक्षण करण्यासाठी इतरत्र उभे रहावे लागत आहे.
वडणेर येथून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे बसथांब्याजवळ प्रवाशांची गर्दी दिसून येते. परिसरात पिण्याच्या पाण्याची देखील कोणतीही सोय उपलब्ध नाही. प्रवाशी निवारा नसल्याने प्रवाशांना वाढत्या उन्हाचा व पावसाचा सामना करावा लागत आहे. सकाळी व सायंकाळी प्रवाशांची संख्या अधिक असते.
दरम्यान, प्रवासी बसच्या प्रतिक्षेत भररस्यात थांबतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संतधार पाऊस लागल्याने प्रवाशांना बसथांब्यावर थांबणे असह्य होत आहे. विशेषतः लहान मुले, महिला व वयोवृद्ध प्रवाशांना नाहक त्रास करावा लागत आहे. या ठिकाणी प्रवाशी निवारा व प्रसाधनगृह उभारावा, अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशी वर्गातून होत आहे.याबाबत स्थानिक नेतेमंडळी,समाजसेवक,व पत्रकारांनी संबंधित विभागाकडे शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशी करत आहेत.
Total Users : 10829