
वाडा पोलीस ठाणे हद्दीतील मेटा फिल्ट प्रा लि कंपनीत दरोडा टाकणाऱ्या ५ आरोपींना पकडण्यात वाडा पोलीस ठाणे यांना यश…
पाण्यात पोहून लोखंड चोरांच्या मुसक्या आवळल्या
पालघर प्रतिनिधी ji24news
दि.२१/०८/२०२३ रोजी वाडा पोलीस ठाणे हद्दीतील मेट गावी असलेल्या मेटाफिल्ड प्रा. लि. या बंद कंपनीमध्ये काही इसम हे कंपनीच्या आत मध्ये चोरी करण्याचे उद्देशाने घुसल्याची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते वाडा पोलीस ठाणे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी तात्काळ सदर माहिती ही उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे जवाहर विभाग व पोलीस निरीक्षक सुरेश कदम वाडा पोलीस ठाणे यांना दिली.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पालघर यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे जवाहर विभाग व पोलीस निरीक्षक सुरेश कदम वाडा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद बंद पडलेल्या कंपनीच्या घटनास्थळी दुपारी ०३:४५ वाजता चे सुमारास पथक तयार करून कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले असता त्या ठिकाणी असलेल्या चोरांनी पोलिसांना पाहताच पळ काढला त्यांचा सदर पथकाने पाठलाग केला असता त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने त्यामध्ये पोशि बाबासाहेब घुगे, व पोशि चेतन सुनावणे हे जखमी झाले. परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही शेवटी त्यापैकी दोन इसमाने नदीत उडी मारून नदी पार करून पाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चेतन सोनवणे व स्थानिक ग्रामस्थ यांनी नदीत उडी मारून त्या दोन चोरांना पकडून एका एकाला पाण्यातून बाहेर काढले पळालेल्या इसमांपैकी पाच इसमांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी ची नावे १) रवाब बर्कुल्ला शहा, वय ६० वर्ष, राहणार धानिवबाग, बाबाभाई यांची चाल, वसई, मूळचा राहणार उत्तर प्रदेश, २) मेराज नूर मोहम्मद शहा, वय २१ वर्षे, राहणार नवजीवन ऑटो गॅरेज, वसई, मूळचा राहणार उत्तर प्रदेश, ३) वैभव रवींद्र जाधव, वय २४ वर्ष, मालबीडी, भिवंडी, ४) अब्दुल कलाम शम्मीउल्ला खान, वय ३८ वर्षे पेल्हार, वसई, मूळचा राहणार उत्तर प्रदेश, ५) चिराग अरुण पाटील, चिंचघर, वाडा अशी आहेत.
सदन आरोपींनी त्यांच्यासोबत आणलेल्या गॅस कटरच्या सहाय्याने कंपनीच्या आतील भागातील तसेच कंपनीच्या पाठीमागील असलेल्या ओपन स्पेस मधील असलेले कंपनीचे मोठे मोठे लोखंडी अँगल कापून ते एका जागेवर ढिक मारून ठेवल्याचे दिसले त्याबाबत वाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ३४७/२०२३ भा. द.वि.सं.क. ३९५, ३५३, ३३२, ३३७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा सपोनि प्रदीप गीते, वाडा पोलीस ठाणे हे करीत आहेत. या कारवाईच्या वेळी पोऊनि संतोष वाकचौरे, पोहवा/३६९ आर.गवळी, पोहवा/६०५ जी.सोनवणे, पोशि चेतन सोनवणे, पोशि घुगे, पोशि वाघचौरे,
पोशि जनाठे यांनी मोलाची कामगिरी बजावली.
Total Users : 10829