
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची महावितरण कडून दखल…
प्रतिनिधी -ji24news जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे ग्रामपंचायत अंतर्गत हेदुलिपाडा या गावची फ्युज पेटी पावसाने गंज लागून सोडून गेली होती त्यामुळे गावाला लागून ट्रान्सफॉर्म असल्याने फ्युज पेटी ओपन असल्याने तेथील नागरिकांना धोका होता रहदारीचा रस्ता असल्याने गावातील नागरिक तसेच गाई, म्हशी यांना शॉक लागण्याची भीती होती त्यामुळे गावातील नागरिक व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष जयवंत हागोटे यांनी दिनांक.8 ऑगस्ट 2023 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड त्रंबकेश्वर येथे निवेदन दिले होते त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सात दिवसात फ्युज पेटी नवीन बसविण्यात आली त्याबद्दल गावातील नागरिकांनी संघटनेचे आभार व्यक्त केले उपस्थित संघटनेचे पदाधिकारी उत्तम लिलके, बुधा ढोरे, सोमनाथ खोटे, रामदास शीद, प्रभाकर गारे .
Total Users : 10828