ji24news

पोलीस पाल्यांकरिता, सेवानिवृत्त पोलीसांच्या पाल्यांकरिता व गृहरक्षकांच्या पाल्यांकरिता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन…

पोलीस पाल्यांकरिता, सेवानिवृत्त पोलीसांच्या पाल्यांकरिता व गृहरक्षकांच्या पाल्यांकरिता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन..


प्रा. दिनेश राठोड ( ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा

वर्धा जिल्हा पोलीस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित
पोलीस मुख्यालय येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे वर्धा जिल्हा पोलीस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस पाल्यांकरीता, सेवानिवृत्त पोलीसांच्या पाल्यांकरीता, गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता २५ ऑगस्ट २०२३ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमांचे प्रमुख अतिथी रामदास तडस (खासदार, लोकसभा वर्धा जिल्हा मतदारसंघ) यांचे हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक वर्धा नूरुल हसन व उपाध्यक्ष डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, ईला हायरिंग टेक्नोलॉजीचे संचालक अंकित हिवरे यांचे उपस्थीत करण्यात आले.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. वर्धा जिल्हा नागपूर जिल्हयातील नामांकीत कंपन्या स्टेट बॅंक ऑफ इंडीया, इरॉस हयुदई, ॲबको कॉम्पुटर, आरोही इंन्फो, वी-फलायओरीयस टेक्नोलॉजी, एलआयसी, पटेल एंडस्कील फाउंडेशन, धूत ट्रांसमिशन, ईला हायरिंग टेक्नोलॉजी इत्यांदी उमेदवारांचे साक्षात्कार घेवून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली.
कार्यक्रमाअंती नूरुल हसन यांनी निवड झालेल्या एकुण ८० उमेदवारांची या रोजगार मेळाव्यादरम्यान विविध कंपन्यांद्वारे निवड झालेली असून २८ उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप केल्या गेले व इतर ५२ उमेदवार यांची अंतिम निवड कंपनीचे संचालकाकडुन होणाऱ्या मुलाखाती करीता राखुन ठेवण्यात आलेली आहे.
ज्या उमेदवारांची काही कारणास्तव निवड होवू शकली नाही, अशांना सुध्दा आजचा अनूभव गाठीशी ठेवून पुनश्च नवीन जोमाने व हिम्मतीने तयारी करण्याकरीता नूरुल हसन साहेब यांनी प्रोत्साहीत केले.
वर्धा जिल्हा पोलीसांचे पाल्याकरीता असा रोजगार मेळावा घेण्यात आल्याची ही प्रथमच वेळ असून असा रोजगार मेळावा दरवर्षी व्हावा अशी मागणी पोलीस विभागातील परिवारांकडून होत आहे. पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे पाल्यांना नोकरी मिळाल्यास ते सुध्दा निश्चिंत होवून आपले शासकीय कर्तव्य चांगल्या प्रकारे करू शकतात. असे मनोगत पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी पत्रकारांसोबत बोलतांना व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर, सपोनि. संदिप कापडे व कर्मचारी सायबर शाखा, वर्धा, सपोनि. लक्ष्मण लोकरे, व कर्मचारी पोलीस कल्याण शाखा, वर्धा यांनी प्रयत्न केले. रोजगार मेळाव्याकरीता उपरोक्त कंपनीचे प्रतिनिधी व एकुण ३०३ उमेदवार यांनी उपस्थीती नोंदविली.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर