
पोलीस मित्र संघटनेच्या महिला विभागातर्फे रक्षाबंधनाचा कार्यक्रम पालघर क्षेत्रातील विविध पोलिस ठाण्यात उत्साहाने साजरा
प्रा.सोमनाथ सातपुते वार्ताहर-ji24news
पोलीस मित्र संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष सुलक्षण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा सचिव राजेश संखे यांच्या पुढाकाराने एक राखी आपल्या पोलिस बांधवांसाठी हा उपक्रम पालघर क्षेत्रातील विविध पोलिस ठाण्यात उत्साहाने साजरा करण्यात आला.
दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी पालघर क्षेत्रातील बहुतेक पोलीस ठाण्यामध्ये पोलीस मित्र संघटनेच्या महिला विभागातर्फे मोठ्या उत्साहाने रक्षाबंधनाच्या कार्यक्रम पार पाडण्यात आला
रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा हा सण म्हणजे बहिण भावाच्या अतूट नात्याचा सण बहिण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी राखी बांधते तसेच आयुष्यभर आपले रक्षण करावे असं वचन बहिण भावाकडून घेते
याच भावनेतून सर्व पोलीस कर्मचारी आपले बांधव आहेत त्यांचा योग्य सन्मान होणे गरजेचे आहे पोलीस मित्र संघटनेतील सर्व महिलांनी प्रत्येक विभागातील महिला अध्यक्षांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली व इतर महिला सभासदांनी ‘एक राखी आपल्या पोलीस बांधवांसाठी’ या उपक्रमात सहभागी होऊन दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी पालघर पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालय पालघर येथे सुवर्णा वाघमारे आणि त्यांच्या टीमने रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पाडला. त्याचप्रमाणे सातपाटी येथे नलिनी राऊत यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला.बोईसर येथे रंजना संखे आणि महिला अध्यक्ष् अपेक्षा संखे तसेच पाचमार्ग येथे पुष्पा तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आणि सफाळे पोलीस स्टेशन येथे हर्षला गावड यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला.
या अभिनव कार्यक्रमातून पोलीस मित्र संघटना पालघर जिल्ह्याच्या वतीने पोलीस बांधव तसेच कर्मचारी यांच्या बद्दल आपला आदर आणि भावनिक नाते दृढ करण्याचा छोटासा प्रयत्न केल्याची भावना जिल्हा अध्यक्ष व जिल्हा सचिव यांनी व्यक्त करून दाखवली.
जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस मित्र संघटनेच्या सर्व महिला सभासदांचा व पदाधिकाऱ्यांचा योग्य तो सन्मान केला आणि त्यांचे आभार मानले.
Total Users : 10829