
विविध पक्षीय बहिणींकडून लाडक्या भाऊ पोलिसाला बांधल्या राख्या
जव्हार : ji24news प्रदीप कामडी
श्रावण महिन्यातील अतिशय पवित्र समाजाला जाणारा स्नेहाचा आणि प्रेम व आपुलकीचा रक्षाबंधन सण म्हणजे भाऊ बहिणीच्या अपार प्रेमाचा सण आहे, यात सणाचे औचित्य साधत जव्हार शहर तथा तालुक्यातील विविध पक्षीय बहिणींकडून जव्हार पोलीस ठाण्यातील लाडक्या भाऊराया पोलिसांना राख्या बांधून एका अतिशय वेगळ्या रक्षाबंधन सणाचे दर्शन घडवून दिले आहे.
ऊन, पाऊस अथवा कडाक्याचे थंडी असो अशा कोणत्याही नैसर्गिक संकटाची तमा न बाळगता, नेहमीच मदतीला सक्रिय असणाऱ्या भाऊ पोलिसाला आपले रक्षण व्हावे म्हणून, जव्हार शहर व तालुक्यातील श्रमजीवी संघटना, भारतीय जनता पक्ष महिला आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी तसेच जव्हार पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी, यांनी गुरुवारी जव्हार पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या लाडक्या पोलीस भाऊरायाला राखी बंधू बहिण भावाची नाती निर्माण होऊन या तालुक्यातील व शहरातील शांती अबाधित राहावी, सर्व प्रकारचे गुन्हे कमी व्हावेत, अश्या विविध प्रकारच्या कामना बहिणीने पोलीस भाऊराया प्रति प्रतीत होऊन त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली आहे, या रक्षाबंधन सनाकरिता जव्हार शहर तथा तालुक्यातून शेकडो महिलांनी एकत्र येऊन जव्हार पोलिसांसमवेत रक्षाबंधन हा सण साजरा केला. यावेळी जाफर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ब्राह्मणे तथा सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आपल्या लाडक्या बहिणींना दिल्या.
Total Users : 10829